IndiaSportsUpdate : मीराबाईची आता मज्जाच मज्जा !! डॉमिनोज इंडिया देणार आयुष्यभर नि:शुल्क पिझ्झा !! सरकारकडून १ कोटीची घोषणा

Advertisements
Advertisements
Spread the love

टोकियो : ऑलिम्पिकच्या पहिल्याच दिवशी भारताला रौप्य पदकाची सुखद भेट  मिळवून देणाऱ्या मिराबाई चानूने आपल्या विजयानंतर पिझ्झा खाण्याची इच्छा व्यक्त केली होती. हि बातमी पाहताच पिझ्झा जायंट डॉमिनोज इंडिया यांनी  मिराबाई चानू यांना आयुष्यभर विनामूल्य पिझ्झा देणार असल्याची घोषणा केली असल्याने मीराबाईच्या मज्जाच मज्जा होणार आहे. दरम्यान डॉमिनोज इंडियाच्या या ट्विट वर त्यांच्या या घोषणेवर अनेकांनी  कंपनीचे कौतुक केले आहे.

Advertisements

एका मुलाखती दरम्यान मिराबाई चानूने  तिला पिझ्झा खाण्याची इच्छा आहे असं सांगितल होत. आता हीच इच्छा बहुराष्ट्रीय पिझ्झा जायंट डॉमिनोज यांनी मिराबाई यांना आयुष्यभर नि:शुल्क पिझ्झा देण्याची घोषणा केली. डॉमिनोज इंडियाने घेतलेल्या या निर्णयाच सगळीकडे कौतुक होतं आहे.

Advertisements
Advertisements

डॉमिनोज इंडिया शनिवारी मिराबाई चानू यांच्या ऑलिम्पिक रौप्यपदाच्या विजयानंतर एक ट्विट केलं. ‘भारताच्या ऑलिम्पिक पदकामध्ये आणि तुम्ही नेहमी जे म्हणता की मी फक्त एक तुकडा खाणार यात काय साम्य आहे? हे फक्त पहीलं आहे अनेकामधून’ या ट्विटवर गीतार्थ कलिता या युजरने “मिराबाई चानू जेव्हा भारतात परत येतील तेव्हा तिला पिझ्झा द्या .. मी तिचे बिल भरेन” या ट्विट वरती डॉमिनोज इंडियाने रिप्लाय देत म्हंटल की “तुम्ही बोललात आणि आम्ही ऐकलं. मिराबाई चानू यांना पिझ्झा खाण्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागेल म्हणून आम्ही त्यांच्यासाठी आयुष्यभर विनामूल्य डोमिनोजच्या पिझ्झा देणार आहोत.” ही घोषणा डॉमिनोज इंडियाने मिराबाई चानू यांच्या ऑफिशियल अकाऊटला टॅग करत केली.

मणीपूर सरकारकडून १ कोटीची घोषणा

मीराबाईने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत  वेटलिफ्टींग प्रकारात  रौप्यपदक जिंकून मीराबाईने इतिहास घडवला. माळरानावर लाकडं गोळा करुन डोक्यावर मोळी बांधणारी मीरा ते ऑलिंपिक रौप्यपदक विजेता मीराबाई चानू हा तिचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यामुळेच, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिच्या यशाचं सेलिब्रेशन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मीराबाईचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे. विशेष म्हणजे मणीपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंग यांनी मीराबाईला १ कोटी रुपयांचं बक्षीस देणार असून तिच्यासाठी सरकारी नोकरीतही स्पेशल पोस्ट देणार असल्याची घोषणा केली.

आयओएकडूनही  ४० लाखांचे  बक्षीस

मीराबाई चानू मूळची मणिपूरची आहे आणि येथील सरकारनं गेल्याच महिन्यात आपल्या राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या पारितोषिकाची घोषणा केली होती. राज्यांसोबतच भारतीय ऑलिम्पिक संघानंही (आयओए) पदक विजेत्या खेळाडूंसाठी पारितोषिकं जाहीर केली आहेत. आयओएकडून केल्या गेलेल्या घोषणेनुसार सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ७५ लाख, रौप्य पदक विजेत्या खेळाडूंना ४० लाख आणि कांस्य पदक विजेत्या खळाडूंना २५ लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यानुसार मीराबाई चानू हिला आयओएकडून ४० लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे.

आपलं सरकार