Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : काय म्हणाले पंतप्रधान आजच्या मन कि बात मध्ये ?

Spread the love

नवी दिल्लीः ‘मन की बात’ मध्ये मांडले जाणारे ७५ टक्के विचार आणि संशोधन हे ३५ वर्षांखाली तरुणांचे आहेत. एक प्रकारे ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशातील तरुण चालवत आहेत. ‘मन की बात’ हा त्यांच्या सकारात्मक विचारांचे आणि संवेदनशीलचे माध्यम आहे, असे उद्गार  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या मन कि बात मध्ये बोलताना काढले.

नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ मधून संवाद साधताना  टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूचे अभिनंदन केले आणि म्हणाले कि , ऑलिम्पिकमध्ये भारताचा तिरंगा फडकताना बघून रोमांचित झालो. खेळाडूंचा उत्साह वाढवणे  गरजेचे  आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. पण कोरोना अजूनही गलेला नाही. यामुळे कुठलाही उत्सव असो की कार्यक्रम यावेळी कोरोनाच्या नियमांचे  पालन करायला  विसरू नका, असेही  मोदी म्हणाले.

देशात स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा कर आहेत. यावेळी स्वतंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्यांचे स्मरण केले जात आहे. यामुळे १५ ऑगस्टला राष्ट्रगीत नक्की म्हणा, असे  आवाहन करताना ते म्हणाले कि ,  ‘नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट’ या मंत्रासह आपल्याला पुढे जायचं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. १५ ऑगस्टला यंदा राष्ट्रगीताशी संबंधित एक प्रयत्न करण्यात येत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाकडून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन राष्ट्रगीत म्हणावं. यासाठी एक वेबसाइटही बनवण्यात आली आहे. राष्ट्रगान डॉट इन. स्वातंत्र्याचे ७५ वर्षे साजरे करत असताना १२ मार्चला साबरमती आश्रमातून ‘अमृत महोत्सव’ला सुरवात करण्यात आली होती. या दिवशी गांधीजींच्या दांडी यात्रेचे स्मरण केले गेले.

दरम्यान उद्या २६ जुलैला ‘कारगिल विजय दिवस’ आहे. कारगिलची लढाई भारतीय सैन्याचे शौर्य आणि संयमाचे प्रतीक आहे. संपूर्ण जग याचा साक्षी आहे. यावेळी हा ‘कारगिल विजय दिवस ‘अमृत महोत्सवा’दरम्यान साजरा होत आहे, असे  पंतप्रधान मोदी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!