IndiaNewsUpdate : मतदारांना ५०० रुपयांची लाच देणाऱ्या खासदार कविता यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा

Advertisements
Advertisements
Spread the love

हैदराबाद – लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी तेलंगना राष्ट्रीय समितीच्या खासदार मलोत कविता यांना नामपल्लीतील विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असल्याचे वृत्त आहे. कविता या तेलंगनातील महबूबाबादच्या खासदार आहेत. त्यांच्या एका सहकाऱ्यालासुद्धा या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं असून शिक्षा सुनावली आहे.सहा महिन्याचा तुरुंगवास आणि १० हजार रुपयांचा दंड अशी हि शिक्षा आहे.

Advertisements

खा. मलोत कविता यांच्यावर त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना पैसे दिल्याचा आरोप होता . या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. मात्र, आरोपींना उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करण्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे. या प्रकरणी कविता लवकरच तेलंगणा उच्च न्यायलयात आव्हान याचिका दाखल करणार आहेत..

Advertisements
Advertisements

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कविता यांचे सहकारी शौकत अली हे पैसे वाटत असताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळले होते. कविता यांना मत देण्यासाठी शौकत अली बर्गमपहाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मतदारांना ५०० रुपये देत होते. यावेळी शौकत अली यांना पोलिसांनी रंगेहात पकडलं आणि लाच प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये कविता यांनाही आरोपी करण्यात आले होते.
पोलिसांनी सुनावणीवेळी फ्लाइंग स्क्वॉ़डच्या अधिकाऱ्यांना साक्षीदार म्हणून हजर केलं. तर त्यांनी तयार केलेला अहवाल पुरावा म्हणून दिला. चौकशी केल्यानंतर शौकत अली यानेही गुन्हा कबूल केला आहे. तसेच कविता यांच्या सांगण्यावरून पैसे वाटल्याचा दावाही केला.

आपलं सरकार