Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ७ हजार ३३२ रुग्णांना डिस्चार्ज , ६ हजार २६९ नवीन रुग्ण

Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात  राज्यात ७ हजार ३३२ रूग्ण करोनातून बरे झाले, तर ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. याशिवाय, आज २२४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,२९,८१७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३५ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.


राज्यातील २९ महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या ९३ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (३१), हिंगोली (५६), यवतमाळ (९), गोंदिया (५८), गडचिरोली (८१) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १०० च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त १५ ,७१४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. परभणी महानगरपालिका क्षेत्रात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक ८६९ रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ६६,४४, ४४८  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५८, ०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२७,७५४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ ,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६६,४४,४४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,५८,०७९ (१३.४२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२७,७५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९३,४७९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत ४१३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ४१३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७, ०९ , ८०९रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४  तासात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ५, ७७९ सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १२४१ दिवसांवर गेला आहे.

देशात ३९, ०९७  नव्या कोरोनाबाधितांची नोंद

दरम्यान गेल्या २४  तासांत ३९ ,०९७  नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर ५४६  कोरोनाबाधितांनी जीव गमावला आहे. यापूर्वी शुक्रवारी ३५ , ३४२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच गेल्या २४  तासांत ३५, ०८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक झाली आहे. एकूण ४ लाख ८ हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!