CoronaMaharashtraUpdate : राज्यात ६ हजार ८४३ नवीन करोनाबाधित तर १२३ रूग्णांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ६ हजार ८४३ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर १२३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर ५ हजार २१२ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी कमी होताना दिसत असले, तरी देखील अद्यापही दररोज नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. शिवाय, करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे सांगितले जात असतानाच, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्याबाबतही सतर्क केले जात आहे. तर, दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्यी ही कधी कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत जास्त तर कधी कमी आढळून येत आहे.

Advertisements

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,३५,०२९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

Advertisements
Advertisements

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,६८,४६,९८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,६४,९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१७,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ९४,९८५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार