CoronaIndiaUpdate : देशात ३९ हजार ७४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली  : देशात गेल्या २४ तासांत ३९ हजार ७४२ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन कोटी १३ लाख १७ हजार ९०१ झाली आहे. तसेच ५३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जाणून घेऊया देशातील कोरोनाची सद्यस्थिती…

Advertisements

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनामुळे आतापर्यंत ४ लाख २०  हजार ५५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या २४  तासांत ३९, ९७२ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या तीन कोटी ५ लाख ४३ हजार १३८ वर पोहोचली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ८ हजार २१२  वर पोहोचली आहे.

Advertisements
Advertisements

आरोग्य मंत्रालयाने  जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत जवळपास ४६ लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल (शनिवारी) ४५ लाख ७४ हजार २९८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर देशात आतापर्यंत लसीचे ४३ कोटी २६  लाख ५ हजार ५६७  लसीचे डोस देण्यात आले आहेत.

आपलं सरकार