Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : राज कुंद्राच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ

Spread the love

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि निर्माता राज कुंद्रा याला अश्लील फिल्मच्या निर्मितीप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथेही त्याला दिलासा मिळालेला नाही. राज कुंद्राच्या बेकायदेशीर उद्योगांबद्दल आणखी माहिती मिळावी यासाठी पोलिसांनी त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे राज कुंद्रा आणि त्याचा सहकारी रेयान थोर्पे दोघांनाही आणखी काही दिवस पोलीस कोठडीतच राहावं लागेल. २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीतच ठेवायचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.


दरम्यान, या पॉर्नोग्राफीमधून मिळालेला पैसा राजने ऑनलाइन सट्टेबाजीसाठी लावला असल्याचा पोलिसांना संशय आहे. राज कुंद्राच्या येस बँके आणि युनायटेड बँक ऑफ आफ्रिका या खात्यांतून झालेल्या व्यवहारांची चौकशी पोलिसांना करायची आहे. न्यायालायने या दोघांची पोलीस कोठडी वाढवली असून त्यांची रवानगी पुन्हा एकदा भायखळा कारागृहात झाली आहे. अश्लील व्हिडिओ, चित्रपट व वेब सीरिज बनवून ते मोबाइल अॅप व संकेतस्थळांवर अपलोड करत असल्याच्या आरोपावरून उद्योजक रिपू सुदन बालकिशन कुंद्रा ऊर्फ राज कुंद्राला सोमवारी १९ जुलै रोजी अटक झाली होती. त्यानंतर राजला अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते.

पाच दिवसांमध्ये काय माहिती मिळाली ?

या पाच दिवसांमध्ये राज आणि त्याचा साथीदार रायनची कसून चौकशी झाली. चौकशीमध्ये अनेक खळबळजनक गोष्टी पुढे आल्या आहेत. राजला अटक होण्याआधी मढ येथील एका बंगल्यावर पोलिसांनी छापा घातला. त्यावेळी त्यांना तिथून पॉर्न व्हिडिओचे चित्रीकरण सुरू असलेले दिसले. त्यानंतर या सर्वांना पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत आणि तपासामध्ये राज कुंद्रा याच्याविरुद्ध सबळ पुरावे पोलिसांना मिळाले. त्याच्या आधारावर राज कुंद्राला अटक करण्यात आली. राज कुंद्रा अश्लील कंटेट आणि पोर्नोग्राफीची निर्मिती करायचा आणि ते वितरित करण्यासाठी दररोज Whatsapp ग्रूप तयार करायचा अशी माहिती पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे.

दरम्यान शर्लिन चोप्राने या प्रकरणात काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. शर्लिनने शेयर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटले आहे कि , ‘राज कुंद्रा प्रकरणामध्ये महाराष्ट्र सायबर सेलच्या टीमला सर्वात प्रथम जबाब देणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून ती मी होते’. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे.  या प्रकरणामध्ये मॉडेल आणि अभिनेत्री असणाऱ्या पूनम पांडे आणि शर्लीन चोप्रा खुलेपणाने बोलत आहेत. नुकताच शर्लिन चोप्राने आपला एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिने खळबळजनक खुलासे केले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!