Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ७ हजार ७५६ रुग्णांची कोरोनावर मात तर ७ हजार ३०२ नवे रुग्ण

Spread the love

मुंबई  : राज्यात गेल्या  २४ तासात ७ हजार ७५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यात आतापर्यंत ६० लाख १६ हजार ५०६ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचबरोबर ७ हजार ३०२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत ४ कोटी ६२ लाख ६४ हजार ५९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी ६२ लाख ४५ हजार ५७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. हे प्रमाण १३.५ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात ९४ हजार १६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. ५ लाख ५१ हजार ८७२ जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर ३ हजार ७४३ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.०९ टक्के इतका आहे.


मुंबईत गेल्या २४ तासात ३९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५०२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७ लाख ८ हजार ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबई रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ टक्के इतकं आहे. सध्या मुंबईत ५ हजार ८९७ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर हा १ हजार १५२ वर पोहोचला आह. १५ जुलै ते २१ जुलै दरम्यान रुग्ण वाढीचा दर ०.०६ टक्के इतका होता.

देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण

केंद्रीय आरोग्यमंत्रालाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या २४ तासात ४१ हजार ३८३ नवे रुग्ण आढळले. तर ३८ हजार ६५२ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच ५०७ रुग्णांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या देशात ४ लाख ०९ हजार ३९४ बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत देशात ३ कोटी १२ लाख ५७ हजार ७२० करोना रुग्ण आढळले आहेत. यापैकी ३ कोटी ०४ लाख २९ हजार ३३९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत ४ लाख १८ हजार ९८७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचा पर्याय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे देशात लसीकरण सुरू आहे. आतापर्यंत देशात ४१ कोटी ७८ लाख ५१ हजार १५१ लसीचे डोस देण्यात आले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 275

औरंगाबाद जिल्ह्यात आज 26 जणांना (मनपा 03, ग्रामीण 23) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 355 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 110 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 480 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 275 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (09)
विवेकानंद नगर 1, आदर्श कॉलनी ठाकरे नगर 2, अन्य 6,

ग्रामीण (19)
गंगापूर 2, कन्नड 7, वैजापूर 7, पैठण 2, सोयगाव 1,

मृत्यू (02)
घाटी (02)
1. 38,पुरुष,वैजापूर
2. 60, पुरुष, अकोली वडगाव वैजापूर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!