Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SocialMediaUpdate : असाच बिलगून रहा… गाण्याला मिळतेय रसिकांची पसंती, तरुणाईला भुरळ पाडणारं नवं गाणं…

Spread the love

मुंबई – सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर असलेल्या स्वप्ना पाटसकर यांच्या सुरेल आवाजात आलेलं असाच बिलगून रहा… हे गीत सध्या चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. गाण्यांशी संबंधित असलेल्या जिओ सावन, अमेझॉन म्युझिक, अँपल म्युझिक अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात हे गीत ऐकलं जात आहे.


तरुणाईला भुरळ पाडणारं हे गीत अतिशय रोमँटिक असं आहे. या गीताचं लेखन योगेश तळेकर आणि स्वप्ना पाटसकर यांनी केलं आहे तर कासव, नाळ या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटासह फिरकी, पॅसेंजर, अल्लमा अशा चित्रपटांचे साऊंड एक्सपर्ट स्वरूप जोशी आणि व्हिज्युअल एक्सपर्ट असलेल्या स्वप्ना पाटसकर अर्थात स्वप्ना-स्वरूप या जोडीनं संगीतबद्ध केलं आहे. तर ट्यूनस्मिथ ओरिजिनल्सनं याची निर्मिती केली आहे.

सध्या मान्सूनच्या मोसमात तरुणाईला आकर्षित करणारं हे गाणं जिओ सावन,अमेझॉन म्युझिकसह अन्य प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. प्रियकर आणि प्रेयसीची एकमेकांविषयीची ओढ प्रकट करणारं हे रोमँटिक गीत आहे.

या गीतनिर्मितीच्या प्रक्रियेबद्दल सांगताना गेली 22 वर्ष या फिल्ममेकिंग, सिनेमॅटोग्राफीच्या क्षेत्रात काम करत असलेल्या आणि या गीताच्या गायिका स्वप्ना पाटसकर यांनी सांगितलं की, कोरोनामुळे सगळीकडे भीती, निराशेचं वातावरण होतं. त्यात लॉकडाऊनमुळं लोकं जास्तच अडकून पडली. या नैराश्यातून बाहेर पडण्याचं एक मोठं शस्त्र म्हणजे संगीत. आम्ही या काळात संगीतावर एकत्र काम करायचं ठरवलं. आणि त्यातून या गीतांची निर्मिती झाली. स्वतःची नवनिर्मिती करणं हा आनंददायी आणि समाधान देणारा अनुभव आहे.

या काळात आम्ही वेगवेगळ्या प्रकारची गाणी निर्माण केली. यात प्रेमगीत, ट्रान्स विठ्ठल, कबिराचे दोहे यासह अन्य काही गीतप्रकारांचा समावेश आहे, असं स्वप्ना यांनी सांगितलं.आम्ही आमची काम करून आवड म्हणून ही कला जोपासत असल्याचं त्या म्हणाल्या. स्वरूप जोशी म्हणाले की आमची ही निर्मिती लोकांना आवडत आहे ही आमच्यासाठी प्रेरणा देणारी आणि आणखी नवीन निर्मिती करण्यासाठी ऊर्जा देणारी गोष्ट असल्याचं ते म्हणाल्या. भविष्यात देखील आम्ही यासह आणखी काही गीतं आई शीर्षक गीतांवर काम करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!