Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

EducationNewsUpdate : कमाल झाली !! दहावी उत्तीर्ण होऊनही ११ वीत थेट प्रवेश नाही , सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Spread the love

मुंबई : दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ११  वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक आज जाहीर झाले आहे . २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी १ च्या दरम्यान अकरावी सीईटी परीक्षा राज्यभरात घेतली जाणार आहे. २० जुलै सकाळी ११:३०पासून  ते २६ जुलै पर्यंत परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले आवेदन पत्र ऑनलाईन भरायचे आहे. १० वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीईटी परिक्षेची आता वाट पाहत होते.

या परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार नाही. इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी १७८ रुपये शुल्क भरावे लागणार आहे.  अर्ज नोंदणी करताना विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र निवडता येणार आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे. सीईटी परीक्षा ऐच्छिक असणार असून १०० गुणांसाठी गणित, विज्ञान, समाजशास्त्र , इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. परीक्षा बहुपर्यायी उत्तरांची असणार असून ओएमआर पद्धतीने घेतली जाणार आहे.

दहावी  परीक्षेत अंतर्गत मूल्यपामनद्वारे लागलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना ९० टक्के, १०० टक्के गुण मिळाले असले तरी  उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच अकरावी सीईटी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे.  त्यामुळे या सीईटी परीक्षेत सुद्धा चांगले गुण मिळवण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.  यावर्षी पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यपामनद्वारे लागला असून या पद्धतीनुसार बहुसंख्य  विद्यार्थ्यांना ९० टक्के टक्केहुन अधिक गन मिळाले आहेत. मात्र, हे गुण मिळून सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या पसंतीचे नामांकित कॉलेज मिळणार नाही. कारण तुम्हला यंदाच्या वर्षी नामांकित कॉलेज मध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर अकरावी सीईटी परीक्षेत सुद्धा तुम्हाला चांगले गुण मिळवावे लागणार आहेत. कारण त्या गुणांच्या आधारेच मेरिट लिस्ट नुसार नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!