#ViralVideo : रेल्वे रूळ ओलांडताना वृद्द व्यक्ति ट्रेन खाली…

Advertisements
Advertisements
Spread the love

कल्याण रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना ट्रेन खाली आडकलेल्या एका वयोवृद्द नागरिकाचे प्राण ट्रेनच्या चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले. एक व्यक्ती ट्रेनखाली येत असल्याचे दिसताच या ट्रेन चालकाने तातडीने आपत्कालिन ब्रेक दाबला. यामुळे या वयोवृद्ध नागरिकाचे प्राण वाचवे. चालकाच्या या सतर्कतेमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Advertisements

अंगावर काटा उभा करणाऱ्या या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईवरून  वारणसीला जाणाऱ्या ट्रेनसमोर हा प्रसंग घडला. ही वयोवृद्ध व्यक्ती थेट रेल्वे रुळ ओलांडत पुढे जात होती. हे ट्रेन चालक पायलट एस. के. प्रधान आणि सहाय्यक एल. पी. रविशंकर यांच्या लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपात्कालिन ब्रेक दाबला. ट्रनचा धक्का लागून हे वयोवृद्ध खाली कोसळले आणि ट्रेनच्या खाली गेले. मात्र तेवढ्यात ट्रेन थांबली होती. ही घटना पाहताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. ट्रेनच्या खाली अडकलेल्या या व्यक्तीला या पाटलय आणि रेल्वे चालकांनी खेचून बाहेर काढले. ही व्यक्ती सुखरूप असून तिला किरकोळ जखमा झाल्या आहेत. काही ठिकाणी अंगावरील शर्ट फाटला आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार