Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SSCResultUpdate : आपण पाहू शकता आता दहावीचा निकाल, बोर्डाची वेबसाईट सुरळीत

Spread the love

पुणे :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. सकाळी विभागनिहाय पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून दहावीच्या विद्यार्थ्यांना वेबसाइटवर निकाल पाहता येणार होता. पण ४ तासाहून अधिक वेळ झाला तरी निकाल पाहण्यात अडचणी येत होत्या. अखेर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही वेबसाइट आता सुरु झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले होते. वेबसाइट लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी विद्यार्थ्यांना दिला होता.

दरम्यान माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचे करण्याचे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

या ठिकाणी उपलब्ध आहे निकाल

mahresult.nic.in

sscresult.mkcl.org

maharashtraeducation.com

कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.

– त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!