Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : ड्रायव्हिंग लायसनसाठीचे नियम बदलले , खासगी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलला येणार महत्व

Spread the love

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचे नवे नियम बनवले आहेत.  त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यासाठी आता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही कि , लांब रांगामध्ये उभे राहण्याची गरज नाही.  इतकेच नव्हे तर प्रकारच्या ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत, हे नियम या महिन्यापासून लागू झाले आहेत. या नव्या बदलामुळे आरटीओच्या ड्रायव्हिंग परवान्यासाठी वेटिंग लिस्टमध्ये पडून असलेल्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

… मात्र हे बंधनकारक !!

वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे ही, आता आरटीओमध्ये जाऊन वाहन परवाना घेण्यासाठी चाचणीची गरज नाही. मात्र, अर्जदारांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी ते कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण स्कूलमध्ये ड्रायव्हिंग परवान्यासाठी स्वत:ची नोंदणी करु शकतात. त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे चाचणी उत्तीर्ण करावी लागेल. अर्जदारांना ड्रायव्हिंग स्कूलद्वारे प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात येईल.

असे आहेत नवे नियम

प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते व परिवहन मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी देखील आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे.  हे नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. अधिकृत एजन्सीने हे सुनिश्चित केले पाहिजे की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी किमान एक एकर जमीन, मध्यम आणि अवजड प्रवासी वस्तू वाहने किंवा ट्रेलर्ससाठी प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.
२. प्रशिक्षक किमान बारावी पास असावा आणि किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, रहदारीच्या नियमांमध्ये तो पारंगत असावा.
३. मंत्रालयाने अध्यापन अभ्यासक्रमही हे शिक्षण निर्धारित केले आहे. हलकी मोटार वाहने चालविण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त चार  आठवडे २९ तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटरचा अभ्यासक्रम दोन भागात विभागला जाईल. थेरी आणि प्रॅक्टिकल.
४. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहर रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ आणि उतारावर वाहन चालविणे इ. चालविण्यास शिकण्यात २१ तास घालवावे लागतात. थेरी भागात संपूर्ण कोर्सच्या ८ तासांचा समावेश असेल, त्यामध्ये रस्ते शिष्टाचार, रस्ता रेज, ट्रॅफिक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!