Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NandedNewsUpdate : ११ वर्षांपूर्वीच्या खून खटल्यात खंडपीठाकडून जन्मठेप कायम

Spread the love

औरंगाबाद – ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरुन ११ वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा न्या. श्रीकांत कुलकर्णी आणि न्या.व्ही.के.जाधव यांच्या खंडपीठाने कायम केली आहे.

तुळशीराम बालाजी पुप्पलवाड(३५) रा.पाटोदा ता.नायगाव जिल्हा नांदेड असे आरोपीचे नाव आहे. २०१०साली पाटोदा गावात १५डिसेंबर रोजी दुपारी एक वा. शंकर वेंकट पुप्पलवाड याचा आरोपी तुळशीरामने चाकूने सपासप वार करुन खून केला होता. सप्टेंबर २०१०मधे पाटोदा गावात झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत मयत शंकरच्या  गटातील महिला उमेदवार बिनविरोध निवडणूकीत जिंकली याचा राग मनात ठेवंत तुळशीराम पुप्पलवाड ने शंकर पुप्पलवाडचा खून केला.

या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तर बिलोली कोर्टाने या प्रकरणात आरोपी तुळशीरामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.म्हणून आरोपीने बिलोली कोर्टाच्या निकालाला उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले.आरोपीचे वकील अॅड.एस.यु.चौधरी यांनी युक्तीवाद करतांना बाजू मांडली की, पोलिसांनी या प्रकरणात खोटे साक्षीदार उभे केले होते.म्हणून खुनाचा प्रकार नसून आरोपी म त्यूस कारणीभूत ठरला.दहा वर्षांपासून आरोपी अंडर ट्रायल आहे. आता त्याची जामिनावर मुक्तता व्हावी. पण एकूण घडलेला प्रकार आणि आरोपी तुळशीरामचा जबाब पाहता तुळशीराम ने ठरवून मयत शंकर चा काटा काढला. असा निष्कर्ष खंडपीठाने काढला.सरकार पक्षातर्फे या प्रकरणात अॅड. एस.पी. देशमुख यांनी काम पाहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!