Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : नाना पटोले यांचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांच्यावर शाब्दिक प्रहार

Spread the love

पुणे : मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. काही नाही”, असे प्रतिपादन  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर  बोलताना केले. 

यावेळी बोलताना पटोले यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावरही  निशाणा साधला. त्याचबरोबर पुण्याच्या पालकमंत्रीपदी काँग्रेसचा व्यक्ती बसवण्याची शपथ घ्या, असे  आवाहन पटोले यांनी कार्यकर्त्यांना मेळाव्यात केले. ते म्हणाले कि,“आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचे  ऐकायचे  की नाही ते त्यांनी ठरवायचे … कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला.

“कोणत्याही समितीवर नावे  पाठवायची असतील, तर पालकमंत्र्यांची सही लागते. हा जो त्रास आहे, या त्रासाला तुम्ही आपली ताकद बनवा. या त्रासाला आपली मानसिक कमजोरी बनवू नका. जो त्रास तुम्हाला आज मिळतोय… आमचा हिस्सा असतानाही आम्हाला देत नाहीत ना ठीक आहे. पण मी माझ्या कर्माने उद्याच्या काळात इथला पालकमंत्री बनेल… आमच्या पक्षाचा माणूस या खुर्चीवर बसेल ही ताकद घेऊन निघाले  पाहिजे. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे”, असे  सांगत नाना पटोलेंनी काँग्रेस कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीसाठी लागण्याची सूचना केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!