Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशातील कोरोनमुक्त आणि नव्या रुग्णांची संख्या समान , ८९८ जणांचा मृत्यू

Spread the love

नवी दिल्लीः गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे ४१,४६३ नवीन रुग्ण आढळून आले असून  ४१,५२६ जण कोरोनामुक्त झाले. तर ८९८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. उपचार घेणाऱ्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९०८ कमी झाली. गेल्या अनेक दिलवसांपासून कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या नव्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक आहे. रोज सरासरी ४० हजार नागरिक कोरोनामुक्त झाले. यानुसार देशातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ही ३ कोटींवर जाण्याची शक्यता आहे.

देशातील ८ राज्यांमध्ये पूर्णपणे लॉकडाउन सारखे निर्बंध आहेत. यात पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, तामिळनाडू, मिझोराम, गोवा आणि पुदुच्चेरीचा समावेश आहे. गेल्या लॉकडाउनसारखे निर्बंध आहेत.

देशातील २३ राज्यांत आणि केंद्र शासित प्रदेशांत आंशिक लॉकडाउन आहे. या राज्यांमध्ये निर्बंधांसह थोडी सूट देण्यात आली आहे. यात छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, बिहार, दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरयाणा, पंजाब, जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मेघालय, नागालँड, आसाम, मणिपूर, त्रिपुरा, आंध्र प्रदेष आणि गुजरातचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!