Prakash Ambedkar Health bulletin : वंचितच नेते प्रकाश आंबेडकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीने बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्या कुटुंबियांशी ते बोलले असल्याची माहिती  वंचितच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी  दिली आहे. प्रकाश आंबेडकर हे सध्या आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. याबाबत रेखा ठाकूर यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून त्यांनी हि माहिती दिली आहे.

Advertisements

रेखा ठाकूर यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि, “वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून हलका आहार घेण्यास सुरुवात झाली आहे. व्हिडीओ कॉलवरून ते कुटुंबियांशी बोलले आहेत. प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही असे डॉक्टरांनी कळविले आहे.”

Advertisements
Advertisements

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्तिगत कारणांसाठी पक्षाच्या कार्यक्रमांपासून पुढील तीन महिने दूर राहणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तीन महिन्यांच्या कार्यकाळात पक्षाचे कार्यक्रम सुरू राहावेत यासाठी रेखा ठाकूर यांची पक्षाच्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान  रेखा ठाकूर यांनी काल दि . ९ जुलै रोजी एक पत्रक जारी करुन प्रकाश आंबेडकरांच्या तब्येतीची माहिती देताना म्हटले होते कि , प्रकाश आंबेडकर यांच्यावर ८ जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी कळवले  आहे. अजून काही दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येईल.

या शास्त्रक्रियेनंतर ते  तीन महिने विश्रांती घेणार असून या दरम्यान कोणत्याही राजकीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. दरम्यान त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेजवरून रोज देण्यात येईल, असेही  रेखा ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, आंबेडकरांना कोणत्या रुग्णालयात आणि कुठे दाखल करण्यात आले  आहे हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

आपलं सरकार