Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात ८ हजार २९६ नवे रुग्ण , ६ हजार ०२६ रुग्ण कोरोनमुक्त

Spread the love

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासात एकूण ८ हजार २९६ नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले असून  एकूण ६ हजार ०२६ इतके रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, आज एकूण १७९ रुग्णांनी प्राण गमावेल आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. आजच्या १७९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्क्यांवर गेला आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५९ लाख ०६ हजार ४६६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०५ टक्के एवढे झाले आहे.

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख १४ हजार इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १८ हजार २३७ इतका आहे. तर, पुण्याच्या खालोखाल ठाणे जिल्ह्यात एकूण १६ हजार ५९८ इतके रुग्ण आहेत. त्यानंतर कोल्हापुरात सक्रिय रुग्ण सर्वात जास्त आहेत. कोल्हापुरात ही संख्या १३ हजार ८०६ इतकी आहे. मुंबई महापालिका हद्दीत सध्या ११ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सांगलीत ही संख्या ११ हजार ४६५, साताऱ्यात ही संख्या ७ हजार ९३९, रत्नागिरीत ३ हजार ४९८, रायगडमध्ये ३ हजार ९५२, सिंधुदुर्गात ३ हजार ३३०, तर नागपूर जिल्ह्यात ही संख्या २ हजार २८९ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४७७ इतकी आहे.

या बरोबरच, अहमदनगरमध्ये ३ हजार ३६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, औरंगाबादमध्ये ८२७, नांदेडमध्ये ही संख्या ४५८ इतकी आहे. जळगावमध्ये ८०७, तसेच अमरावतीत ही संख्या २९२ इतकी आहे. आज राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या यवतमाळ जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या २० इतकी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!