MonsoonNewsUpdate : काय आहे पावसाचा मूड ? पुढील पाच दिवस जोरदार पाऊस

पुणे : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असल्याचे वृत्त वेधशाळेच्यावतीने देण्यात आले आहे. कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गुरुवारी मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याना मान्सूनच्या पावसानं झोडपून काढलं आहे. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि कोकणात अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. पुढील आणखी पाच दिवस राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
दरम्यान अनेक जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आज पुण्यासह राज्यात बहुतांशी ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. आज राज्यात नंदुरबार, भांडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे चार जिल्हे वगळता, सर्वत्र मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान वाऱ्याचा वेगही अधिक असणार आहे. राज्यात आज ताशी ३० ते ४० किमी प्रतितास इतक्या वेगानं वारा वाहणार आहे. आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, आकाशात विजा चमकत असताना घराबाहेर न पडण्याचा आणि मोठ्या झाडाखाली उभं न राहण्याचा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार, पुढील पाच दिवस पुण्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Severe weather warnings issued by IMD today for Maharashtra from 9 Jul to 13 Jul. for 5 th day inf is added on adjoining post please.
Pl visit IMD websites for further details. pic.twitter.com/8PQpBJnilI— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 9, 2021