CoronaMaharashtraUpdate : राज्यात १० हजार ४५८ रुग्णांना डिस्चार्ज , ८ हजार ९९२ नवीन रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत राज्यात १० हजार ४५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ८ हजार ९९२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या १ लाख १२ हजार २३१ इतकी खाली आली आहे. सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि कोरोनाची संभाव्य तिसरी लाट यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या आजच्या नोंदीनुसार २०० रुग्ण गेल्या २४ तासांत दगावले आहेत. तर आतापर्यंत कोरोनाने राज्यात १,२५,०३४ रुग्णांचा बळी घेतला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आजही ९६ टक्क्यांहून अधिक असून सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होत असल्याचे चित्र आहे.
कोरोना एक नजर
आजचे मृत्यू : २०० । मृत्यूदर २.०३ %
नवे रुग्ण : ८ हजार ९९२
डिस्चार्ज रुग्णसंख्या : १० हजार ४५८
आतापर्यंत एकूण ५९,००,४४० रुग्णांची कोरोनावर मात.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ %
आजपर्यंतच्या चाचण्या : ४,३५,६५,११९
एकूण ६१,४०,९६८ (१४.१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह.
सध्या राज्यात ६,२७,२४३ व्यक्ती होमक्वारंटाइन.
४,७५६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
राज्यात सध्या १ लाख १२ हजार २३१ ॲक्टिव्ह रुग्ण.