Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : देशात १५०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या सूचना

Spread the love

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या संदर्भात गांभीर्याने उपाययोजना करण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठकीत दिल्या. या बैठकीत देशातील ऑक्सिजनची निर्मिती वाढवणे आणि पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. देशात १५०० हून अधिक ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येत आहेत. या ऑक्सिजन प्लांटद्वारे ४ लाखाहून अधिक ऑक्सिजन बेडना सपोर्ट मिळेल, असे पंतप्रधान मोदीं यांनी यावेळी सांगितले.

अद्याप देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ही ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येऊ शकते, असे बहुतेक संस्थांनी आणि तज्ज्ञांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर देशात औषधांची आणि ऑक्सिजनची उपलब्धता निश्चित करण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान ऑक्सिजनची मोठी कमतरता निर्माण झाली होती. वेळेवर ऑक्सिजन न मिळल्याने अनेक रुग्णांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सरकारने ऑक्सिजनची उपलब्धता वाढवण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू केले होते. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरात लवकर सुरू व्हावं. यासाठी आवश्यक व्यवस्था केली जावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती आणि साठा वाढवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यासंबंधीही बैठकीत चर्चा झाली.
या प्रकल्पाच्या दरम्यान ऑक्सिजन प्लांट चालवणं आणि त्याच्या देखभालीसाठी हॉस्पिटल्सच्या कर्माचऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. यामुळे अचानक कुठलीही समस्या निर्माण झाल्यास ती तातडीने दूर करता येईल.ऑक्सिजन प्लांट्सची कार्यक्षमता आणि कार्यपद्धती ट्रॅक करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जावा, अशी सूचना पंतप्रधान मोदींनी बैठकीत केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!