Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : आईच्या देहाचे तुकडे करून काळीज खाऊ पाहणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा

Spread the love

कोल्हापूर : दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून  आईची  क्रूर हत्या करून तिचे  काळीज कापून खाऊ पाहणाऱ्या  नराधमाला आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने  फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील रामा कूचकोरवी असे या नराधम  मुलाचे नाव आहे. त्याने आईच्या शरीराचे तुकडे करून हे तुकडे  फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. दुर्मिळातील दुर्मिळ घटना समजून कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

ऑगस्ट २०१७ मध्ये हि खळबळजनक आणि  धक्कादायक घटना घडली होती. जिल्हा न्यायाधीश महेश जाधव यांनी निकाल देताना फाशीची सुनावली आहे. आरोपीने आईचा खून करून घृणास्पद कृत्य केले  आहे. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरातील माकडवाला वसाहतीत  अंगाचा थरकाप उडवणारी हि घटना घडली होती. आईने केवळ दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून सुनील याने घरामध्येच आईची क्रूर पद्धतीने  हत्या केली. त्यानंतर सुनीलने धारदार शस्त्राने आईचे एक एक अवयव धडापासून वेगळे केले. इतकेच नाही तर आईचे  काळीज कापून ते भाजून खाण्याचा प्रयत्न देखील केला होता.

कोल्हापुरातील शाहुपुरी पोलीस ठाण्यांमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल झाला होता. या खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सहा जुलै रोजी जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली. आज सत्र न्यायाधीश जाधव यांनी ही दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाची घटना असल्याचे नमूद करत करत आरोपी सुनील याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दरम्यान आरोपी सुनील याला शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहाकडे घेऊन जात असताना त्याचं चित्रीकरण करणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना त्याच्या नातेवाईकांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलीस निरीक्षक आणि तपास अधिकारी संजय मोरे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!