Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ModiCabinetExpansion Live : दोन खुलासे : राजीनाम्याच्या यादीत दानवे नाहीत , तर नव्या मंत्रिमंडळात प्रीतम मुंडे नाहीत…

Spread the love

नवी दिल्ली : देशात सध्या सर्वत्र मोदींच्या विस्तारित मंत्रिमंडळाची चर्चा असून त्यात काही अफवाही पसरवल्या जात आहेत. यापैकी एक अफवा म्हणजे रावसाहेब दानवेंच्या राजीनाम्याची . पण हि बातमी खरी नाही स्वतः रावसाहेब दानवे यांनी तास खुलासा केला आहे. ते दिल्लीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे पण त्यांना राजीनामा देण्यास सांगितले गेलेले नाही त्यामुळे त्यांचे मंत्रिपद कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . तर मोदी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात  बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे नाव चर्चिले जात होते परंतु माझी बहीण प्रीतम आणि मी मुंबईतच असल्याचे ट्विट दस्तुरखुद्द पंकजा मुंडे  यांनी केले असल्याने त्यांचे नाव यादीत नसल्याचा खुलासा झाला आहे.

दरम्यान प्रसामाध्यमांकडून काही दिवसांपासून प्रीतम मुंडे यांचे नाव चालवले जात होते परंतु त्यांना दिल्लीचे बोलावणे आले नसून त्या मुंबईतच असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटल्यानंतर याची स्पष्टोक्ती झाली आहे. वास्तविक  मंत्रिपद मिळणार अशी शक्यता होती. पण, त्यांचे नाव वगळण्यात आले असून मराठवाड्यातून औरंगाबादचे राज्यसभेचे खासदार भागवत कराड यांना मंत्रिपदाची संधी मिळत आहे.

आपल्या ट्विटमध्ये   पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे कि , ‘खासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबईच्या निवासस्थानी आहोत’ असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

दरम्यान ओबीसी नेतृत्व कायम राखण्यासाठी प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद दिले जाईल असा अंदाज प्रसारमाध्यमांनी वर्तविला होता परंतु याच समाजातून येणाऱ्या डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपदाची संधी मिळत असल्याचे वृत्त आहे. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर असून लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना राज्यसभेवर आणि आता थेट मंत्री म्हणून घेतले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!