Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ModiCabinetExpansion Live : शपथविधी सोहळ्याला प्रारंभ , नारायण राणे यांच्यापासून प्रारंभ

Spread the love

४३. निसिथ प्रामाणिक

४२. डॉ. एल. मुरुगन

४१. जॉन बारला

४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई

३९. शंतनू ठाकूर

३८. विश्वेश्वर तुडू

३७. डॉ. भारती पवार

३६. डॉ. राजकुमार सिंह

३५. डॉ. भागवत कराड

३४. डॉ. सुभाष सरकार

३३. प्रतिमा भौमिक

३२. कपिल पाटील

३१. भगवंत खुबा

३०. चौहान देवुसिंह

२९. अजय कुमार

२८. बी. एल. वर्मा

२७. अजय भट्ट

२६. कौशल किशोर

२५. ए. नारायणस्वामी

२४. अन्नपूर्णा देवी

२३. मीनाक्षी लेखी

२२. दर्शना विक्रम जरदोश

२१. भानूप्रताप सिंह वर्मा

२०. शोभा करांडलाजे

१९. राजीव चंद्रशेखर

१८. सत्यपाल सिंग बघेल

१७. अनुप्रिया सिंग पटेल

१६. पंकज चौधरी

१५. अनुराग सिंग ठाकूर

१४. जी. किसन रेड्डी

१३. पुरुषोत्तम रुपेला

१२. भूपेंद्र यादव

११. मनसुख मंदाविया

१०. हरदीप सिंग पुरी

९. राजकुमार सिंह

८. किरण रिजाजू

७. पशुपति कुमार पारस

६. अश्विनी वैष्णव

५. रामचंद्र प्रसाद सिंग

४. ज्योतिरादित्य शिंदे

३. विरेंद्र कुमार

२. सर्बांनंद सोनोवोल

नवी दिल्ली : देशभर चर्चा असलेला  केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार थोड्याच वेळात सुरु होत आहे.

एकूण ४३ सदस्यांचा शपथविधी होत आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनुसूचित जाती, जमातीच्या नेत्यांचाही समावेश करण्यात येणार आहे.

एएनआयने  दिलेल्या वृत्तानुसार, मंत्रिमंडळ विस्तारात अनुसूचित जातीमधून १२ सदस्य असतील. यामधील दोन कॅबिनेटमध्ये असतील. तर आठ सदस्य अनुसूचित जमातीमधून असतील. यामधील तिघे कॅबिनेटमध्ये असतील.

आधी ९ कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनीही राजीनामा दिला असल्याचे वृत्त आहे.

-मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मोदी सरकारमध्ये ओबीसीमधील एकूण २७ मंत्री असतील ज्यामधील पाच कॅबिनेटमध्ये असतील. याशिवाय कॅबिनेटमध्ये उच्चशिक्षित नेत्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न असल्याची सूत्रांची माहिती आहे. विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळात एकूण १३ वकील, सहा डॉक्टर, पाच इंजिनिअर आणि सात सनदी अधिकारी असतील अशी सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान नव्या मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्याचा जास्त प्रयत्न आहे. यामुळे ५० पेक्षा कमी वय असणाऱ्या १४ नेत्यांना संधी देण्यात येणार असून यापैकी सहा मंत्रिमंडळात असतील. याशिवाय प्रशासकीय अनुभवासाठी ३९ माजी आमदार आणि चार माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा भाग असतील.

याशिवाय अल्पसंख्यांक समाजातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात समावून घेतलं जाणार आहे. ख्रिश्चन, मुस्लिम आणि शीख समाजातील प्रत्येकी एक आणि बौद्ध समाजातील दोन नेत्यांना संधी मिळणार आहे. तसंच ईशान्य भारतातील पाच मंत्री असतील अशी माहिती मिळत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!