Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ModiCabinetExpansion Live : जंबो मंत्रिमंडळ : मोदींचे सोशल इंजिनिअरिंग, ४३ जणांमध्ये कोण कोण आहेत ते बघा…

Spread the love

नवी दिल्ली : भाजपसहित सर्व देशाचे लक्ष राजधानीतील नरेंद्र मोदीकृत मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे. आज संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान  मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. या विस्तारित शपथविधीत तब्बल ४३ नवे मंत्री शपथ घेतील. यात नव्या आणि जुन्या दोन मंत्र्यांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पशुपती कुमार पारस, भुपेंद्र यादव, अजय भट्ट, मिनाक्षी लेखी यांचा समावेश आहे.

दरम्यान मंत्रिमंडळाच्या या नव्या नवीन विस्तारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल इंजिनिअरिंगचा फॉर्म्युला वापरत नव्या राजकारणाची आणि सत्ताकरणाची व्युव्हरचना केली आहे .  त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात २७ ओबीसी आणि २० अनुसूचित जाती -जमातीमधील नेत्यांना  संधी देण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

याबाबत  हाती आलेल्या माहितीनुसार मोदींच्या नवीन कॅबिनेटमध्ये १२ मंत्री मागास समाजातील आहेत. यात प्रत्येक मंत्री विविध अनुसूचित जातीमधील आहे. या १२ मंत्र्यांपैकी २ जणांना कॅबिनेट मंत्रिपद देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २७ मंत्री ओबीसी  समाजातील आहेत. यात १९ मंत्री असे आहेत जे मागासवर्गीय जातीतून येतात. यादव, कुर्मी, जाट, दर्जी, कोळी अशा समाजाचा समावेश आहे. ओबीसी समाजातील ५ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं तर ८ मंत्री अनुसूचित जमातीमधील आहेत.

याशिवाय ५ मंत्री वेगवेगळ्या अल्पसंख्याक समाजातील आहे. यात मुस्लीम १, शिख १, बौद्ध २ आणि १ ईसाई धर्मातील आहे. त्याशिवाय २९ ब्राह्मण, लिंगायत, पटेल, मराठा आणि रेड्डी समाजातील आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कॅबिनेट विस्तारात ११ महिलांचा समावेश आहे. यातील २ महिलांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला जाईल. नवीन मंत्रिमंडळ विस्तारात युवा चेहऱ्यांवर भर देण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींच्या कॅबिनेट विस्तारात महाराष्ट्रातील ६ नेत्यांचा समावेश असल्याचे  सांगितले जात आहे. यात खासदार नारायण राणे, कपिल पाटील,  डॉ. भागवत कराड, हिना गावित, प्रीतम मुंडे, भारती पवार यांच्या नावाचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!