Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MonsoonNewsUpdate : ९ तारखेनंतर “तो ” राज्यात पुन्हा येईल !!

Spread the love

मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन होताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मान्सूनची चाहूल लागताच शेतकऱ्यांनी पेरणीला ही सुरुवात केली. परंतु मध्येच पावसाने दडी मारली आता पुन्हा आठवड्याभराने राज्यात पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. ८ ते ९ जुलैनंतर राज्यभर पावसाचे पुन्हा कमबॅक होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढच्या तीन दिवसांत अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरतील. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. मात्र कोकणात पुढच्या पाच दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून आजच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या तीन-चार तासांमध्ये राज्यभर पाऊस पडेल असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक आणि मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे माजी उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून आजच्या हवामानाबद्दल माहिती दिली आहे.

पूर्वानुमानानुसार, जुलैच्या पहिल्या आठवड्यातही कोकण विभागात फारसा पाऊस नाही. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडू शकतो. त्यानंतर २ ते ८ जुलै या आठवड्यामध्ये विदर्भामध्ये तसेच लगतच्या मराठवाड्याच्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मात्र, याचे प्रमाण ९ ते १५ जुलैच्या आठवड्यात वाढण्याची शक्यता आहे. या काळात राज्यात सर्वदूर पाऊस असू शकेल. तसेच कोकणातही पुन्हा पावसाचा वेग वाढेल असा, अंदाज आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!