Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आठ प्रदेशांत नवे राज्यपाल नियुक्ती

Spread the love

देशभरात केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून आठ प्रदेशांत नवे राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री थावर चंद गेहलोत यांची कर्नाटकच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. मोदी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजस्थानातून येणाऱ्या आणि दलित नेते अशी ओळख असणाऱ्या केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकार मंत्री थावर चंद गेहलोत यांना कर्नाटकचे राज्यपालपद देण्यात आले आहे.

राष्ट्रपतींकडून जाहीर करण्यात आलेली राज्यपालांची यादी राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

  • मिझोरमच्या राज्यपालपदी हरि बाबू कमभमपती राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी मंगूभाई छगनभाई पटेल राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारु दत्तात्रय यांची हरयाणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मिझोरमचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लई यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांचे त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांची झारखंडच्या राज्यपाल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!