Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 43 नवे रुग्ण , 76 जणांना डिस्चार्ज , एक मृत्यू

Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 571 कोरोनामुक्त,
466 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 76 जणांना (मनपा 14, ग्रामीण 62) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 571 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 43 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 480 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 443 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 466 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (11)
स्वस्तिक नगर 1, जाधववाडी 1, एन-3 सिडको 1, कैसर कॉलनी 1, स्टेशन रोड फॉरेस्ट कॉलनी 2, पन्नालाल नगर 1, गारखेडा परिसर 1, एन-12 हडको 1, घाटी 1, सातारा परिसर 1
ग्रामीण (32)
सिडको महानगर-1 येथे 2, दौलताबाद 1, अन्य 29
मृत्यू (01)
घाटी (01)
1. स्त्री/45/म्हस्की, वैजापूर

आपलं सरकार

Click to listen highlighted text!