Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra assembly session Live : मोठी बातमी : अखेर अध्यक्षांना शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन

Spread the love

– मराठा आरक्षणावर चालू आहे चर्चा , सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण देत आहेत माहिती


मुंबई : राज्य विधान मंडळाच्या अधिवेशनात सभागृहात शिवीगाळ  करीत गोंधळ घालून तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या १२ आमदारांवर एक वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव एकमताने पास करण्यात आला. यामध्ये १. पराग अळवणी, २. राम सातपुते, ३. संजय कुटे, ४. आशिष शेलार, ५. अभिमन्यू पवार, ६. गिरीश महाजन, ७. अतुल भातखळकर, ८. शिरीष पिंपळे, ९. जयकुमार रावल, १०. योगेश सागर, ११. नारायण कुचे, १२. किर्तीकुमार बागडिया यांचा समावेश आहे. दरम्यान हा ठराव पास होताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बहिष्काराची घोषणा करीत सभागृहाचा त्याग केला.


अधिवेशनात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र सरकार इम्पेरीकल डाटा उपलब्ध व्हावा तसा ठराव मांडला. पण बोलू न दिल्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला.
छगन भुजबळ यांनी ठराव मांडला त्यावर, अध्यक्षपदी बसलेले भास्कर जाधव ऐकत नसल्याने फडणवीस यांनी हेडफोन सभागृहात खाली फेकून दिला. भाजपा आमदार सभागृहात गोंधळ घातला. भाजप आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आणि माईक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृह १५  मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. भास्कर जाधव दालनकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सभागृहात नेमके काय झाले ?

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली. ओबीसी आरक्षणावरून विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे निदर्शनास आले. ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. या गोंधळातच सभागृहात ठराव मांडण्यात आला. त्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. विधानसभेचे कामकाज १० मिनिटं स्थगित करण्यात आले.

विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की

विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. देवेंद्र फडणवीस यांना सभागृहात बोलू दिलं नाही असा आरोप करण्यात आला. यावेळी भास्कर जाधव यांना विरोधी आमदारांकडून धक्काबुक्की झाली. त्यानंतर आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद सोडवण्यात आला. मात्र विधानसभा कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी तालिका अध्यक्षांवर दबाव टाकणाऱ्या आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी केली. विधानसभेत पुन्हा गोंधळ झाल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी सभागृहाचे कामकाज पुन्हा १५ मिनिटांसाठी स्थगित केले. मात्र विधानसभा दालनात तालिका अध्यक्षांना कुठल्याही पद्धतीची धक्काबुक्की झाली नाही असे  देवेंद्र फडणवीसांनी दावा केला.

दरम्यान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा केवळ राजकीय ठराव असल्याची टीका केली. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सात दिवसाची नोटीस देणे बंधनकारक आहे. आधी नियम स्थगित करायला हवा होता. जी सूचना आलेली आहे ती कायद्यात बसत नाही असे  सांगत आक्षेप घेतला. यावर छगन भुजबळ यांनी तुम्ही पंतप्रधानांकडे जा आणि मागा. श्रेय तुमचे आम्ही तुमच्यासोबत येतो. ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त का नाही केल्यात. तुम्ही ६ ते ७ वर्षे काय केलत? अशी विचारणा केली.

सभागृहात मोठा गोंधळ

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी हा ठराव मंजुरीसाठी टाकला असता विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. या गदारोळातच ठराव मंजूर करण्यात आला. ठराव विधानसभेत पारित होत असताना विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांच्यासह अनेक आमदार वेलमध्ये उतरले. आमदार संजय कुटे आणि गिरीश महाजन यांनी अध्यक्षांचा राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थितीचे भान ठेवत आमदार आशिष शेलार यांनी संजय कुटे, गिरीश महाजन यांच्यासह सर्व आमदारांना वेलमधून आपल्या जागेवर नेले.

गदारोळामुळे  पुन्हा दहा मिनिटांसाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. यावेळी अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप फेटाळला असून लक्ष भरकटवण्यासाठी आरोप केले जात असल्याचा दावा केला.

फडणवीस यांनी माईकच फेकून दिला….

दरम्यान देवेंद्र फडणवीस हे बोलण्यासाठी उभे राहिले पण सभापती भास्कर जाधव यांनी त्यांना बोलू दिले नाही. त्यामुळे भाजपच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या व्यासपीठाला घेराव घातला. इकडे बोलू न दिल्यामुळे फडणवीस यांनी माईकच फेकून दिला. या गोंधळातच ओबीसी आरक्षणाबाबतच ठराव मंजूर करण्यात आला. पण, भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पण, त्यानंतर भास्कर जाधव दालनाकडे जात होते, तेव्हा भाजपच्या आमदारांनी त्यांना घेराव घातला. यावेळी भास्कर जाधव यांनी संजय कुटे यांना धक्काबुक्की केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि सभागृह पुन्हा सुरु झाल्यानंतर सभागृहात शिवीगाळ करून गोंधळ केल्याबद्दल १२ आमदारांचे निलंबन करण्याचा ठराव झाला. या दरम्यान त्यांना कुठल्याही अधिवेशनात सहभागी होता येणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!