Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live Maharashtra assembly session 2021 : शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन

Spread the love

राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन उद्यापासून म्हणजेच ५ आणि ६ जुलै रोजी होत आहे. नेहमीप्रमाणे हे अधिवेशनही नेहमीप्रमाणे वादळीच ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांत राज्य सरकार आणि विरोधी पक्षात चांगलीच जुंपली आहे. त्यामुळे अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यातील सामना अटळ आहे.


केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

 

  • Maharashtra assembly session Live : खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याचा फडणवीसांचा आरोप

Maharashtra assembly session Live : खोटी स्टोरी रचून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केल्याचा फडणवीसांचा आरोप

  • Maharashtra assembly session Live : मोठी बातमी : अखेर अध्यक्षांना शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन

     

Maharashtra assembly session Live : मोठी बातमी : अखेर अध्यक्षांना शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन

 

  • ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारविरोधात ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला आहे. परंतु, ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. विधानसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.

  • ओबीसी आरक्षणाबाबत मंत्री छगन भुजबळांकडून विधानसभेत ठराव, केंद्रने ओबीसींचा इम्पेरिकल डेटा तात्काळ उपलब्ध करुन द्यावा. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणाचा ठराव मांडताना अर्धसत्य सांगितले असल्याचा आरोप केला आहे.

  • 31 जुलैपर्यंत MPSC च्या सर्व रिक्त जागा भरणार, ही महत्त्वाची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान, एमपीएससी परीक्षे संदर्भात राज्य सरकार समिती गठित करणार असल्याची माहिती आहे. ही समिती एमपीएससी परीक्षा संदर्भात अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.

  • पुण्यात एमपीएसीचा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली ही सरकारच्या गालावरची चपराक असल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत मात्र सरकार काहीही करत नाही असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा अध्यक्ष निवड होत नाही याचाच अर्थ काँग्रेसला काहीच किंमत नाही, सत्तेसाठी काँग्रेस काहीही करू शकते असेही ते म्हणाले.

  • सरकारने लोकशाहीला कुलूप लावले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात बोलताना केला आहे. प्रश्नोत्तरं, तारांकित प्रश्न नसल्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाने आक्षेप व्यक्त केला.

  • पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष निवडणूक होणार नाही. विधानसभेच्या कार्यक्रम पत्रिकेत निवडणुकीसंदर्भात कोणताही उल्लेख नसल्याची माहिती मिळत आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदावरुन काँग्रेसची निराशा झाली असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत.

  • पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजता काँग्रेस पक्षाची विधीमंडळातील पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीस काँग्रेसचे प्रमुख नेते आणि आमदार उपस्थितीत राहणार आहेत.अधिवेशनात काँग्रेस आमदाराची भूमिका यावर बैठकीत चर्चा होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!