Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

UttarPradeshNewsUpdate : ओवेसी हे देशातील मोठे नेते, त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे : योगी आदित्यनाथ

Spread the love

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार बनणार. ओवेसी हे देशातील मोठे नेते आहेत. ते देशभर प्रचार करत असतात. त्यांना एका समुदायाचा मोठा पाठिंबा आहे, पण उत्तर प्रदेशात ओवेसी हे भाजपाला आव्हान देऊ शकत नाही. भाजपा आपले मुद्दे आणि मूल्ये घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरेल. आम्ही त्यांचे आव्हान स्वीकारतो अशा शब्दात ओवेसींनी केलेल्या विधानावर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर दिले.

पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपसह सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून उत्तर प्रदेशातील सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजपाने आपल्या हालचाली वाढवल्या आहेत. या पार्शवभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुख्यमंत्री योगींना आव्हान दिलं आहे. योगी आदित्यनाथ यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही, असं ओवेसी म्हणाले असून, योगी आदित्यनाथांनी ओवेसींचं आव्हान स्वीकारले आहे. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात योगींनी यावर भूमिका मांडताना उत्तर उत्तर दिले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत एमआयएम शंभर जागांवर निवडणूक लढवणार आहे. उमेदवारांची निवड प्रक्रियाही एमआयएमने सुरू केली आहे. याबद्दल त्यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विट करून माहिती दिली होती. “उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीबद्दल काही मुद्दे मांडत आहे. शंभर जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. पक्षाने उमेदवार निवड प्रक्रिया सुरू केली आहे. आमची आघाडीसंदर्भात कोणत्याही पक्षांशी चर्चा झालेली नाही,’ असेही ओवेसी यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान एमआयएमला बिहारमध्ये चांगले यश मिळाल्यामुळे इतर राज्यांमध्येही एमआयएमचा विस्तार होत आहे. आता उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकीतही एमआयएम मैदानात उतरणार आहे. यासाठी असदुद्दीन ओवेसी यांनी मोर्चबांधणी सुरू केली असून, एका रॅलीमध्ये बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल विधान केले होते. ‘योगी आदित्यनाथ यांना पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ देणार नाही,’ असे ओवेसी म्हणाले होते. ओवेसींनी दिलेल्या आव्हानाला आता योगींनी उत्तर दिले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!