Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : धक्कादायक : फेसबुकवरील “फेक लव्हर” मुळॆ तिघांचे गेले प्राण…!!

Spread the love

थिरुअनंतपुरम  : फेसबुकवरील प्रॅन्क म्हणजेच दिल्लगीचा प्रकार तुम्ही रोज बघत असाल. अशाच एका प्रॅन्कमुळे सर्वांनाच  हैराण करणारी घटना नुकतीच समोर आली आहे. केरळच्या कोलम जिल्ह्यातील हि घटना असून  या घटनेत एक महिला आपल्या नवजात बाळाला सोडून फेसबुकवरील प्रियकरासाठी घर सोडून पळून गेली. पण  ही संपूर्ण घटना प्रँक असल्याचे  समोर आले आणि सर्व हबकून गेले. कारण या प्रॅन्कमुळे  या विवाहितेच्या दोन नातेवाईक मुलींचा आणि बाळाचा मृत्यू झाला.


तिहेरी मृत्यूचा हा गुंता सोडवण्यास पोलिसांना जेंव्हा  शनिवारी तेव्हा यश आले, जेव्हा या  प्रकरणाचा  उलगडा झाला आणि घटनेच्या केंद्रस्थानी असलेल्या महिलेचा तथाकथित फेसबुक लव्हर इतर कोणीही नसून तिच्याच नात्यातील दोन महिला हे फेक अकाऊंट चालवत असल्याचे उघडकीस आले तेंव्हा तीन जीव गेले होते.

या घटनेत नात्यातीलच दोन महिला फेसबुकवर प्रियकर बनून रेश्मासोबत बोलत असत. मात्र, पोलिसांकडून पकडले जाण्याच्या आणि प्रँक चुकीच्या मार्गावर गेल्याच्या भीतीनं त्यांनी आत्महत्या केली.  दरम्यान पोलिसांनी चोवीस वर्षीय रेश्माला पोलिसांनी तिच्याच नवजात बाळाची हत्या केल्याच्या आरोपावरून अटक केली होती. तिच्यावर आपल्याच बाळाला कोल्लम जिल्ह्यातील कल्‍लूवथुक्‍कल गावात एका शेतात सोडून गेल्याचा आणि त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. तिच्या बाळाचा मृत्यू रुग्णालयात झाला होता.

पोलिसांनी बाळाच्या आईची ओळख पटवण्यासाठी परिसरातील अनेक महिलांचे डीएनए घेतले. यानंतर २२ जून रोजी रेश्माला अटक कऱण्यात आली.  घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सांगितले , की चोवीस वर्षीय रेश्माचा पती चार महिन्यांआधी कामासाठी विदेशात गेला होता. याच काळात रेश्माची फेसबुकवर एका व्यक्तीसोबत मैत्री झाली. या काळात ती गर्भवती होती. तिची मैत्री पुढे प्रेमात बदलली. मात्र, तिने  घरात कोणालाही आपण गर्भवती असल्याचे  सांगितले नाही. पोलीस तपासात समोर आले , की रेश्मा आपली बहीण आर्याचे  सिम कार्ड वापरत होती.

पोलिसांनी याप्रकरणी आर्यालाही नोटीस पाठवली. मात्र, यानंतर दुसऱ्याच दिवशी आर्या आणि रेश्माच्या वहिनीची मुलगी ग्रीष्मा या दोघीही बेपत्ता झाल्या. या दोघींचाही मृतदेह घराजवळच असलेल्या एका नदीच्या काठावर आढळला. या दोघीही चांगल्या मैत्रिणी होत्या. पोलिसांनी  सांगितले , की ग्रीष्माच्या प्रियकराकडून आम्हाला ही गोष्ट समजली. ग्रीष्माने  सांगितले  की तिचा प्रियकर रेश्मासोबत प्रँक ( दिल्लगी ) करत होता आणि परिस्थिती हाताबाहेर गेली होती. पोलिसांनी नोटीस पाठवल्यानंतर आर्याने आपल्या सासूला ही संपूर्ण घटना सांगितली. मात्र, सासू कामासाठी बाहेर जाताच आर्याने  ग्रीष्मासोबत नदीत उडी घेतली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!