Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : अशी आहे देशातील कोरोनाची ताजी स्थिती

Spread the love

नवी दिल्ली : भारतात गेल्या 24 तासांत 43,071 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी शुक्रवारी 44,111 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान गेल्या 24 तासांत 52,299 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

एक नजर

एकूण कोरोनाबाधित : तीन कोटी 5 लाख 45 हजार 433
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 96 लाख 58 हजार 78
एकूण सक्रिय रुग्ण : 4 लाख 85 हजार 350
एकूण मृत्यू : 4 लाख 2 हजार 5

भारत जगात कितवा ?

काल दिवसभरात 67 लाख 87 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत.3 जुलैपर्यंत देशभरात 35 कोटी 12 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले होते. आतापर्यंत जवळपास 42 कोटी कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 18 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के आहे.
देशातील कोरोनाचा मृत्यूदर 1.30 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. अॅक्टिव्ह रुग्ण 2 टक्क्यांहून कमी आहेत. कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारताचा तिसरा क्रमांक आहे. एकूण कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!