Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : लग्न ठरवून वरपित्याचा ऐनवेळी नकार, फसवणूकीचा गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद – मुलीला मागणी घालून लग्न ठरवल्यानंतर लग्नाच्यावेळी जास्तीच्या पैशाची मागणी करणार्‍या वरपित्यासहित नवरदेव व अन्य कुटुंबियांवर फसवणूकीचा गुन्हा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

बाबूराव कोंगळे हे या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. त्यांनी स्वता:चा मुलगा सागर याचेसाठी मुकुंदवाडीपरिसरात राहणार्‍या मुलीशी लग्न ठरवले. २९नोव्हेंबर २०रोजी साखरपुडा मुलीच्या पालकांनी पार पाडला व साखरपुड्यात ४०हजाराची अंगठी दिली.तसेच १६एप्रिल २१ही लग्नाची तारिख ठरली.पण लाॅकडाऊनमुळे ७जून २१ही तारिख ठरली.म्हणून लग्नासाठी नवरदेवाचे कपडे व फर्निचर असा ५०हजार रु.खर्च वधूपित्याने केला. पण २०मे २१रोजी वधूच्या वाढदिवशी बाबुराव कोंगळे वत्यांच्या मुलींनी वधूच्या घरी जाऊन आणखी १लाख रु.ची मागणी करत लग्न करण्यास नकार दिला. या प्रकरणी वधूपित्याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.पुढुल तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय घायाळ करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!