Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : लाकडी खेळण्याच्या नावाखाली मागवल्या ५० तलवारी ,एकास अटक

Spread the love

औरंगाबाद – ब्ल्यू डार्ट कुरिअर तर्फे अमृतसरहून शहरात लाकडी खेळण्याच्या नावाखाली ५ तलवारी मागवणार्‍या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.ही कारवाई पुंडलिकनगर आणि जिन्सी पोलिसांनी संयुक्त रित्या केल्याची माहिती पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे यांनी पत्रकारांना दिली.


शनिवारी दुपारी ३वा. पुंडलिकनगर पोलिसांनी सेव्हनहिल परिसरात सापळा रचून तलवारींचा साठा जप्त केला. बायजीपुरा परिसरात राहणार्‍या दानिशखान(२३) असे आरोपीचे नाव आहे.इंदीरानगरातील हिना किराणा स्टोअर्स च्या नावाने वरील पार्सल मागवले होते.हा भाग जिन्सी पोलिसांच्या हद्दीत येत असल्यामुळे पुंडलिकनगर पोलिसांना हा गुन्हा जिन्सी पोलिसांकडे वर्ग करावा लागला.
शनिवारी तलवारींचे पार्सल जप्त केल्यानंतर दानिशखानला रात्री उशीरा ताब्यात घेत अटक करण्यात आली.या तलवारी मागवण्यामागे दंगलीचा किंवा घातपाताचा प्रयत्न करणे असा उद्देश नसून शोभेखातर विक्री करण्यासाठी या तलवारी मागवल्याचे आरोपी दानिशखान याने पोलिसांनासांगितल्याची माहिती गिर्‍हे यांनी दिली.

एटीएसचे तपासावर पूर्ण लक्ष

या प्रकरणानंतर एटीएस ने या प्रकरणावर लक्ष केंद्रीत केले असून आम्ही आमच्या दृष्टीने या गुन्ह्यात काही वेगळी माहिती हाती लागते का ? याबाबत शोध घेत आहोत.अशी माहिती एटीएस चे पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.

२०१८ साली अशीच कारवाई

गुन्हेशाखेने तीन वर्षांपूर्वी २०१८साली अशीच कारवाई केली होती. त्यामधे अशी शस्रे वितरित करणार्‍या फ्लिपकार्ट आणि अन्य एका इ काॅमर्स मार्टवर गुन्हा दाखल करण्याची टाळाटाळ झाली होती.त्यावेळी शहरात विक्री करणारे व खरेदी करणारे असे एकूण२९आरोपी या गुन्ह्यात आहेत.याप्रकरणात आरोपपत्रही दाखल झालेले आहे. फ्लिपकार्ट सारख्या इ काॅमर्स कंपन्यांची चौकशी करण्यासाठी शहर पोलिसांचे एक पथक मुंबईला गेले होते.पण त्यांना फ्लिपकार्ट चे अधिकारी भेटले नाही अशी माहिती जिवाची मुंबई करुन आणलेल्या तेंव्हाच्या पोलिसांनी दिली.या गून्ह्याचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला होता.त्यानंतर वरिष्ठ पातळीवरुन याबाबत चौकशी झाली असे पोलिस अधिकारी म्हणतात.

आजही आॅनलाईन पध्दतीने अशी शस्रे मागवली जात आहेत.त्याची खरेदी विक्री हा जामिनपात्र गुन्हा आहे.या कारवाईच्या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे.याचा खुलासा लवकरंच औरंगाबाद पोलिस करणार आहेत.अशी माहिती पोलिसांनी दिली.
वरील कारवाईत पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक घन्नशाम सोनवणे, पोलिस कर्मचारी रमेश सांगळे, बाळाराम चौरे, जालिंदर मांटे,दिपक जाधव यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!