Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PoliticalNewsUpdate : आ. पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

Spread the love

देहरादून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत  यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते आ. पुष्कर सिंह धामी यांची भाजपच्या विधिमंडळ गटनेते पदी निवड करण्यात आली असून ते उत्तराखंडचे पुढचे नवे मुख्यमंत्री असतील असे वृत्त आहे.  पुष्कर सिंह धामी हे उत्तराखंडचे ११ वे मुख्यमंत्री असणार आहेत. आज सायंकाळीच ते मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील. माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पुष्कर सिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

पक्षाच्या सल्ल्याने संवैधानिक अडचणीमुळे केवळ चर्च महिन्यात तीरथ सिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आपला राजीनामा सोपवला. . एका सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने सेवेची संधी दिली. जनतेच्या मुद्यांवर आम्ही सर्वांचं सहकार्य घेऊन काम करू अशी प्रतिक्रिया पुष्कर सिंह धामी यांनी विधिमंडळ दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर व्यक्त केली.

पुष्कर सिंह धामी हे कुमाऊं परिसरातील खटीमा विधासनभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले  असून ते राजनाथ सिंह यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. याशिवाय माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांचे ते विशेष कर्तव्य अधिकारी होते.
तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर आज देहरादूनमध्ये भाजपच्या कार्यालयात विधिमंडळ दलाची एक बैठक पार पडली. या बैठकीत नेतेपदी पुष्कर सिंह धामी यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी, भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि भाजप महासचिव डी पुरंदेश्वरी यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिलं. तसेच प्रभारी दुष्यंत गौतम आणि सह प्रभारी रेखा वर्मा हेदेखील या बैठकीला उपस्थित राहिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!