MumbaiNewsUpdate : आमिरखान -किरण राव : दो हंसोका जोडा बिछड गया….!!

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत मिस्टर परफेश्कनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव परस्पर सहमतीने विभक्त झाले असल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल झाले. स्वत: आमिर खाननेच या वेगळे होण्याची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण राव यांनी याबाबत अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. १५ वर्षांचा त्यांचा संसार होता. त्यांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.
आमिर आणि किरणने जारी केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे कि , ” १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू”.
पुढे या स्टेटमेंटमध्ये ते म्हणाले, “मुलाचा सांभाळ करण्यासोबत आम्ही फिल्म, पाणी फॉउंडेशन आणि आम्हाला आवडत असलेल्या इतर अनेक प्रोजेक्टवर पुढेही एकत्र काम करू. आम्हाला समजून घेत आमच्या या निर्णयात आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आमच्या कुटुंबियांचे आणि मित्र परिवाराचे आभार” असं म्हणत आमिर आणि करणने चाहत्यांकडे देखील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद मागितले आहेत.
किरण रावशी आमिर खानचा हा दुसरा विवाह होता. या आधी २००२ मध्ये आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त यांचा विवाह झाला होता. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला आयला आणि जुनेद ही दोन मुलं आहेत. ‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ मध्ये विवाह केला होता तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने त्यांचा मुलगा आझादचा जन्म झाला होता.