Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : धक्कादायक : सोशल मीडियावर व्हिडीओ जारी करून कला दिग्दर्शकाची आत्महत्या

Spread the love

मुंबई :  मराठीसिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कार्यरत एका कला दिग्दर्शकाने व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  राजू साप्ते असे या कला दिग्दर्शकाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड व्हिडिओही त्यांनी बनवला आहे. या घटनेमुळे सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.

सोशल मीडियावर जारिओ केलेल्या व्हिडीओ मध्ये साप्ते यांनी म्हटले आहे कि,

“नमस्कार मी राजेश मारुती साप्ते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.

माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत आहे.”

शेवटी या व्हिडिओतून  मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेने मराठी सिनेवर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणाकडे आता पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अमेय खोपकर यांचा इशारा

हे धक्कादायक वृत्त समजताच मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, यापुढे कलाकारांना त्रास दिल्यास हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच आहे, असा इशाराच खोपकर यांनी दिला आहे.
आपल्या व्हिडिओमध्ये अमय खोपकर यांनी म्हटले आहे कि , उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याला चित्रपट किंवा मालिकेच्या सेटवर जाऊन चित्रीकरण बंद पाडता येऊ शकत नाही. राकेश मौर्या हा लेबर युनियनचा खजिनदार आहे. या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्याची दादागिरी चालते. त्याच्यापाठी कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याविषयी मला बोलायचे नाही. मात्र, भविष्यात कोणताही निर्माता किंवा दिग्दर्शकाला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून त्रास होत असेल तर मनसेनेशी संपर्क साधावा, असे आवाहन खोपकर यांनी केले आहे. तसेच, भविष्यात कोणताही निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांना युनियनच्या लोकांनी सेटवर जाऊन त्रास दिला तर हातपाय तोडल्याशिवाय राहणार नाही, ही धमकीच समजा, असा थेट इशाराच खोपकर यांनी फेसबुक अकाऊंटवरुन दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!