Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा मृतदेह आता घरी घेऊन जाण्यास परवानगी

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनामुळे सर्वत्र दहशत असताना  केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी महत्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयामुळे  कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा मृतदेह आता घरी घेऊन जाता येणार आहे. दरम्यान देशात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या काहीशी कमी होत असताना, दुसरीकडे केरळमध्ये रोज पाच आकडी नवी रुग्ण संख्या समोर येत आहे. देशात कोरोनाचे ५.५२ लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, त्यापैकी एकट्या केरळमध्ये १ लाख रुग्णसंख्या आहे.

याबाबत मुख्यमंत्री म्हणाले कि , कोरोना काळात कोरोना रुग्णाचे कुटुंबीय , कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकत नव्हते. आता ते कोरोनामुळे मृत्यू झालेल्या आपल्या व्यक्तीला अंतिम श्रद्धांजली देण्यासाठी, अंतिम संस्कार करण्यासाठी घरी घेऊन जाऊ शकतील .

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये दररोज सरासरी टेस्ट पॉझिटिव्ही रेट (TPR) १० टक्क्यांच्यावर आहे. आम्ही अतिशय कमी वेळात टेस्ट पॉझिटिव्ही रेट २९.७५ टक्क्यांवरुन १०टक्क्यांपर्यंत आणण्यात सफल झालो आहे. परंतु यात अजूनही कमी येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!