Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : बीडचे मोबाईलचोर सिडको पोलिसांच्या जाळ्यात ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Spread the love

औरंगाबाद – बीडहून जाधववाडीत मोबाईल चोर्‍या करण्यासाठी आलेले चार चोरटे कार सहित सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यांच्या ताब्यातून ५ मोबाईल आणि स्विफ्ट कार जप्त केली.
परशुराम मोहन गायकवाड (२१) प्रविण राजू जाधव (१९)विठ्ठल सखाराम लष्करे(३४)सनि विजय पतंगे (२५) सर्व रा. बीड  अशी आरोपींची नावे आहेत.  त्यांच्याकडून सिडको पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल असलेला मोबाईल पोलिसांना आरोपींच्या ताब्यात मिळाला.  वरील चारही आरोपी दुसर्‍या जिल्ह्यातील पासिंग असलेली कार घेऊन पिसादेवी परिसरात कारमधे बसलेले आढळून आले.

दरम्यान गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने वरील चौघांची चौकशी केल्यानंतर ते मोबाईल चोर असल्षाचे निष्पन्न झाले. पुढील तपास पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे आणि पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखालीपीएसआय बाळासाहेब आहेर यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!