Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : वाढत्या गर्दीबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता

Spread the love

मुंबई : डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणुमुळे तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारने निर्बंध वाढवले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही.  फक्त स्थिरावली आहे. पण, आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. यामुळे तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही पण गर्दी पहाता दुसरी लाट उलटेन का? हा मोठा धोका असल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.


एमएमआरडीएनं उभारलेल्या मालाड येथील कोविड केअर सेंटरचे  उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले.कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे. जगात इतरत्र करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यामुळं ‘पुढच्यास ठेस, मागचा शहाणा’ या म्हणीप्रमाणं आपल्याला आधीच काळजी घ्यावी लागेल,’ असे  आवाहन यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि , “ट्राफिक जामवर कायम स्वरूपी तोडगा काढण्यात आला. त्याचप्रमाणे आणखी एक चांगली गोष्ट पूर्ण झाली आहे. मालाड येथे कोविड केअर सेंटर. आज लाट ओसरली आहे. आपल्याकडे बेड रिकामे पडले आहेत,  मग आज गरज नसताना असे  का केले  जात आहे, असा सहज प्रश्न कुणालाही पडेल, पण तसे नाही. दुसरी लाट बघितली, तर ऑक्सिजनचा तुटवडा, बेडचा तुटवडा आदींसाठी तारेवरची कसरत करत आपण दुसरी लाट थोपवली. खाली आणली. मात्र, दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही.

आता पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. तिसरी लाट कधी येईल हे सांगता येत नाही. पण गर्दी पहाता दुसरी लाट उलटेन का? हा मोठा धोका आहे. याचं कारण दुसऱ्या लाटेचा विषाणू डेल्टा आहे. आणि आता डेल्टा प्लस आढळून आला आहे. डेल्टा प्लसने अजून रंग दाखवलेले नाहीत. पण, डेल्टाच अजूनही राज्यात आहे. गर्दी टाळली गेली नाही, तर दुसरी लाट ओसरण्याऐवजी उलटेन. ही शक्यता गृहित धरली, तर आज जे आपण करतो आहोत, त्याचं महत्त्व नागरिकांच्या लक्षात येईल,” असा इशारा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!