Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : राष्ट्रपतींच्या वेतनात कपात ? काय आहे सत्य ?

Spread the love

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कपात होणाऱ्या वेतनाची चर्चा चांगलीच रंगली आहे. आपल्या कानपूर दौऱ्यात त्यांनी  एका कार्यक्रमात त्यांचे वेतन पाच लाख रुपये असून त्यापैकी पावणे तीन लाख रुएए करापोटी जातात  मग किती रक्कम शिल्लक राहिली?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

दरम्यान  यापुढे जाऊन राष्ट्रपतींनी अधिकारी आणि शिक्षकांच्या वेतनाची स्वत:ला मिळणाऱ्या वेतनासोबत तुलना केली. कर भरल्यानंतर माझ्याकडे जितकी रक्कम शिल्लक राहते, त्यापेक्षा जास्त पगार आमच्या अधिकाऱ्यांना आणि अन्य लोकांना मिळतो. याठिकाणी काही शिक्षक बसलेत, त्यांनाही सर्वाधिक पगार आहे, असे म्हटल्याने या विषयावरून उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

दरम्यान यामागचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला असता मिळालेली माहिती अशी कि , राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वेतनातून खरंच ३० टक्के रक्कम कापली जात आहे. मात्र ही रक्कम कर म्हणून कापली जात नाही तर  राष्ट्रपती रामनाथ कोविंद ही रक्कम स्वच्छेनेच  दान करत आहेत. ही रक्कम दान करण्याचा निर्णय त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्यात घेतला.

कोरोना संकट असल्यानं कोविंद त्यांच्या वेतनातील ३० टक्के रक्कम दान करणार असल्याची माहिती गेल्या मे महिन्यात राष्ट्रपती भवनाने  दिली होती. राष्ट्रपती भवनातील खर्चात कपात करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. त्यामुळेच राष्ट्रपतींना गेल्या वर्षीपासून ३० टक्के कमी वेतन मिळत आहे. ती रक्कम त्यांनी कर असल्याचं सांगितलं. त्यामुळेच सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत असे लोकमत ऑनलाईन ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!