Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : मोदी सरकारकडून पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात  ४ लाख कोटींची वसुली : प्रियंका गांधी

Spread the love

नवी दिल्ली – संकटाच्या वेळीही केंद्राने पेट्रोल-डिझेलवर कराच्या रुपात देशवासीयांकडून ४ लाख कोटी केले वसूल केले असल्याची टीका  करताना काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी  केंद्र सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींविषयी प्रश्न विचारला आहे. आपल्या फेसबुक पोस्टवरून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कासंदर्भात मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.


या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे कि , पेट्रोल आणि डिझेलवरील करात १२ पट वाढ करुन जनतेची लूट केली जात आहे. “२०१३ साली जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १०१ डॉलर्स होते तेव्हा त्यावेळी देशातील लोकांना पेट्रोल ६६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५१ रुपये प्रति लिटर दराने मिळत होते. त्यावेळी केंद्र सरकार पेट्रोल प्रति लीटर ९ रुपये तर डिझेलवर ३ रुपये प्रति लीटर कर आकारत होती. पण सन २०२१ मध्ये केंद्र सरकार आपल्याकडून पेट्रोल प्रतिलिटर ३३ रुपये आणि डिझेलवर ३२ रुपये कर वसूल करत आहे.”

“भाजपा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १२ पट वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी असताना देशवासीयांना त्याचा फायदा का देण्यात आला नाही? २०१४ पासून कर वसुलीत ३०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ योग्य आहे का? केंद्र सरकारने ७वर्षात पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून २१.५ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. पण त्या बदल्यात मध्यमवर्गीय, गरीब आणि व्यापारी वर्गाला काय मिळाले? संकटाच्या वेळीसुद्धा पेट्रोल आणि डिझेलवरील कराच्या रुपात केंद्र सरकारने देशवासीयांकडून सुमारे ४ लाख कोटी रुपये वसूल केले” असे प्रियंका यांनी म्हटले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!