Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 45 नवे रुग्ण , 109 रुग्णांना डिस्चार्ज , 8, 18, 630 जणांचे लसीकरण

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 109 जणांना (मनपा 19, ग्रामीण 90) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 41 हजार 898 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 45 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 27 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 422 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 707 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (12)

एन-9 पवननगर 1, मुकुंदवाडी 1, छावणी 1, एन-5 सिडको 1, अन्य 08

ग्रामीण (33)

तिसगाव 1, अन्य 32

मृत्यू (05)

घाटी (03)

1. स्त्री/70/कोल्ही, वैजापूर.
2. पुरूष/85/खुलताबाद.
3. पुरूष/50/पांजरगाव, वैजापूर
सामान्य रुग्णालय (01)
1. पुरूष/70/ बोरगाव, खुल्ताबाद.

खासगी रुग्णालय (01)

1. पुरूष/41/प्लॉट क्रमांक-307, खंडोबा मंदिर, औरंगाबाद.

जिल्ह्यातील 818630 जणांचे कोविड लसीकरण

औरंगाबाद  जिल्ह्यात दि.28 जून 2021 पर्यंत एकूण 818630 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असून दि. 28 जून रोजी एकूण 27282 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 11886 जणांनी तर शहरात 15396 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉ.  महेश लड्डा यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.
दि. 28 जून 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 313321 जणांनी पहिला डोस घेतला तर 61605 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 374926 जणांचे लसीकरण झाले आहे.
तर शहरामध्ये 345220 जणांनी पहिला डोस घेतला तर 98484 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 443704 जणांचे लसीकरण झाले आहे.

*

आपलं सरकार

Click to listen highlighted text!