Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : शिवसंग्राम शहरध्यक्षाच्या बैठकीत सोन्याची साखळी हिसकावल्याचा गुन्हा

Spread the love

औरंगाबाद – आ.विनायक मेटे यांच्या उपस्थितीत पडेगावात आज सकाळी ११.३०वा. शिवसंग्राम पक्षाच्या शहराध्यक्षांच्या निवासस्थानी सुरु असलेल्या बैठकीत शिवसेनेच्या विभागप्रमुखांनी बैठकीला न बोलावल्याचा राग धरुन साथीदारांना सोबत घेत शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करंत एक लाख रु.ची सोन्याची साखळी  हिसकावल्याचा गुन्हा छावणी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

या प्रकरणी शिवसेनेचे विभाग प्रमुख अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे,राहूल यलदी, सचिन घनवट यांच्या विरोधात दहशत माजवून चोरी केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
आज सकाळी ११.३० आ.विनायक मेटे यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष उमाकांत माकणे यांच्या निवासस्थानी बैठक सुरु होती. या बैठकीत आरोपी उपस्थितीत होते. किरकोळ कारणावरुन आरोपी म्हस्के यांनी इतर साथीदारांना बोलावून उमाकांत माकणे यांचा मुलगा डाॅ.अभिमन्यू माकणे व विनायक मेटे यांच्या अंगावर धावून जात अभिमन्यू माकणे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार आ.मेटे यांनी पोलिसांना फोन करुन घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!