Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaNewsUpdate : राज्यात  ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ९ हजार ३७१ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

मुंबई : राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात राज्यात  ९ हजार ८४४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातल्या आजपर्यंत करोनाबाधित झालेल्या नागरिकांचा आकडा आता ६० लाख ७ हजार ४३१ इतका झाला आहे. यामध्ये १ लाख २१ हजार ७६७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे दिवसभरात ९ हजार ३७१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा राज्यातला आकडा ५७ लाख ६२ हजार ६६१ इतका झाला आहे. त्यापाठोपाठ राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९५.९३ टक्के इतका झाला आहे.

बुधवारी दिवसभरात राज्यात जो मृतांचा आकडा १६३ होता, तो वाढून गुरुवारी १९७ झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मृतांचा एकूण आकडा १ लाख १९ हजार ८५९ इतका झाला असून राज्याचा मृत्यूदर २ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. गुरुवारच्या या आकडेवारीनुसार मृत्यूदर गेल्या १५ ते २० दिवसांमध्ये १.९५ वरून २ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा ही प्रशासनासाठी चिंतेची बाब कायम राहिली आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या Delta Plus Variant मुळे आरोग्य प्रशासनाची चिंता अधिकच वाढली आहे.

दरम्यान मुंबई महानगर पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार शहरात आज दिवसभरात ७८९ नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. त्यामुळे शहरातल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७ लाख २४ हजार ११३ झाला आहे. मात्र, त्याचवेळी मुबईत आज दिवसभरात ५४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्येतील डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा ६ लाख ९१ हजार ६७० इतका आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे मुंबईत दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रोजच्या मृत्यूंचा आकडा पुन्हा दोनअंकी होऊ लागल्याचं स्पष्ट झालं आहे. आजपर्यंत करोनामुळे मुंबईत १५ हजार ३४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!