Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaWorldUpdate : आता कमाल झाली !! WHO म्हणतेय ‘डेल्टा व्हेरिएंट’वर कोणत्याही लसीचा परिणाम नाही !!

Spread the love

नवी दिल्ली : देशात आणि जगभरात सर्वत्र लसीकरणाची मोहीम जोरात सुरु असताना सध्या परिस्थितीमध्ये जगभरातील करोना लसींपैकी जवळजवळ सर्वच लसी या करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक दिसत नाही. यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी दिली आहे. भविष्यामध्ये कोरोना विषाणूचे नवीन पद्धतीचे व्हेरिएंटही पहायला मिळतील. या व्हेरिएंटवर लस प्रभावी ठरणार नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे जगभरामध्ये करोनाविरुद्ध लढ्यात लसीकरणाचा प्रधान्य दिले जात असून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे सर्वच देश प्रयत्न करत आहेत.


यावर बोलताना जागतिक आरोग्य संघटनेच्या मारिया व्हॅन केर्कोव्ही यांनी म्हटले आहे कि , सध्या लसीकरणामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी फायदा होत असला तरी सतत म्युटेड होत राहणाऱ्या करोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे चिंतेत भर पडली आहे. या विषाणूमध्ये सतत होत राहणाऱ्या म्युटेशनमुळे खूप बदल झालेल्या विषाणूच्या प्रकारावर म्हणजेच कॉन्स्टीलेशन ऑफ म्युटेशन असणाऱ्या विषाणूवर लसीचा परिणाम होणार नाही. भविष्यात या विषाणूला म्युटेड होण्याची संधीच उपलब्ध होऊ न देण्यासंदर्भात संशोधन होणे गरजेचे असल्याचेही मारिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान यापूर्वी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी मात्र आपल्या संशोधनाच्या प्राथमिक अहवालांमध्ये भारतात देण्यात येणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसी या डेल्ट व्हेरिएंटविरोधात खूप कमी प्रमाणात अ‍ॅण्टीबॉडी निर्माण करतात. मात्र डेल्टा व्हेरिएंट सोडल्यास या लसी इतर व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे.

अनेक संशोधनांमध्ये नवी डेल्टा व्हेरिएंट हा लसींविरोधात जास्त प्रतिरोध करत असल्याचे दिसून आले आहे. जूनच्या सुरुवातीला लॅन्सेच मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटनमधील एका संशोधनामध्ये डेल्टा, अल्फा आणि बीटा व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांमधील अ‍ॅण्टीबॉडीज आणि लसीच्या माध्यमातून तयार झालेल्या अ‍ॅण्टीबॉडीज यासंदर्भात तुलनात्मक संशोधन करण्यात आले असून लस या व्हेरिएंटवर किती प्रभावी आहे याचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या जगभरामध्ये डेल्टा व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली जात असल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!