Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पत्नीपाठोपाठ भारताचा वेगवान धावपटू गेला , देशभरातून मिल्खासिंग यांना आदरांजली 

Spread the love

नवी दिल्ली : भारताचे  वेगवान धावपटू  ‘पद्मश्री’ मिल्खा सिंह यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले . मृत्यूसमयी ते ९१ वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असणारे मिल्खा सिंह कोरोना बाधित आढळले होते. ऑक्सिजन पातळी ढासळल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले  होतं. त्यांच्या निधनावर देशभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. याच आठवड्यात मिल्खा सिंह यांच्या  पत्नी आणि भारतीय व्हॉलीबॉल टीमच्या माजी कॅप्टन निर्मल कौर यांचेही कोरोनामुळेच निधन झाले त्या ८५ वर्षांच्या होत्या. यावेळी मिल्खा सिंह पीजीआय रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल असल्याने  त्यांना पत्नीच्या अंत्यसंस्कारातही सहभागी होता आले  नव्हते. मिल्खा सिंह यांच्यामागे त्यांच्या कुटुंबात मुलगा गोल्फर जीव मिल्खा सिंह आणि तीन मुली आहेत.

राष्ट्रपतींची आदरांजली

मिल्खा सिंह यांच्या निधनाच्या बातमीनं दु:खी आहे. त्यांच्या संघर्षाची आणि कणखरपणाची कहाणी येणाऱ्या अनेक पीढ्यांसाठी प्रेरणादायक ठरेल, असं म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मिल्खा सिंह यांना आदरांजली वाहिली. ‘कोट्यवधी तरुणांचे प्रेरणास्रोत, पद्मश्री मिल्खा सिंह यांच्या निधनानं अतिशय दु:खी आहे. त्यांना भावयुक्त श्रद्धांजली. फ्लाईंग शीख यांची कहाणी नेहमीच युवकांना प्रेरणा देत राहील’.

पंतप्रधानांची आदरांजली

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिल्खा सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे . ‘आपण एका महान खेळाडूला गमावलंय. भारतीयांच्या हृदयात मिल्खा सिंह यांच्यासाठी एक खास जागा आहे. आपल्या व्यक्तीमत्वानं त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनानं दु:खी आहे’ असं पंतप्रधानांनी म्हटलंय. ‘मी काही दिवसांपूर्वीच मिल्खा सिंह यांच्याशी संवाद साधला होता. हा आमचा शेवटचा संवाद असेल याची कल्पनाही नव्हती’ अशी आठवणही पंतप्रधानांनी शेअर केली.

नितीन गडकरी यांच्यासह अनेकांची आदरांजली

दरम्यान नितीन गडकरी यांनीही  मिल्खा सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान  मिल्खा सिंह हे एक उत्कृष्ट खेळाडू आणि खेळ जगतातील दिग्गज होते. त्यांनी मिल्खा सिंह यांनी जागतिक अॅथलेटिक्सवर न पुसता येणारा ठसा उमटवला आहे, असे  म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही मिल्खा सिंह यांना आदरांजली वाहताना  ‘फ्लाईंग शीख मिल्खा सिंह यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आहे. देश त्यांचं योगदान नेहमीच लक्षात ठेवील. त्यांच्या निधनानं खेळ जगताला न भरून येणारं नुकसान झाले आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती प्रदान करो’ असं ट्विट केले आहे. तर ‘फ्लाइंग शीख मिल्खा सिंह यांच्या निधनाच्या बातमीनं धक्का बसला. त्यांनी जगभरात भारताची प्रतिमा उजळ केली आणि लाखो तरुणांना प्रेरणा दिली. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती आणि कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती प्रदान करो’ अशी प्रतिक्रिया बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि ‘हम’चे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी यांनी व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!