Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaIndiaUpdate : गांभीर्याने घ्या , देशात तिसरी लाट रोखणे अशक्य : डॉ . रणदीप गुलेरिया

Spread the love

नवी दिल्ली : येत्या सहा ते आठ आठवड्यांत  देशात कोरोना संसर्गाची  तिसरी लाट देशात दाखल होऊ शकते. ही तिसरी लाट रोखणे  अशक्य असल्याचे मत ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. कोरोनाची दुसरी लाट हळू हळू ओसरत असताना देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आल्यामुळे देशातील नागरिकांना अधिक सावधान होण्याची गरज निर्माण झाली आहे.


दरम्यान देशातील लसीकरणावर बोलताना गुलेरिया म्हणाले कि , ‘कोव्हिशिल्ड’ लशीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही, कारण यामुळे जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. आत्तापर्यंत देशातील ५ टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. या वर्षीच्या शेवटपर्यंत देशातील १०८ कोटी लोकसंख्येचे  लसीकरण करणे , हे सरकारचे  लक्ष्य  असून  हे एक मोठे आव्हान आहे.

नागरिकांना आवाहन करताना ते पुढे म्हणाले कि , देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे, कोरोनाविषयक नियमांबाबत लोक फारसे गंभीर दिसत नाहीत.  आपण कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून काहीही धडा घेतल्याचे  सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही. पुन्हा एकदा गर्दी दिसून येत आहे.  अनलॉक प्रक्रियेमुळे अनेक लोक एकत्र येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. किंवा त्यापेक्षा थोडा अधिकही वेळ लागू शकतो. कोविड नियम आपण कशा पद्धतीने हाताळतो आणि गर्दीपासून वाचण्याचा कसा प्रयत्न करतो, त्यावर हे अवलंबून आहे, असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.

दरम्यान ‘रॉयटर्स’च्या एका सर्व्हेनुसार, देशात ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. या सर्व्हेत जगभारतील ४० तज्ज्ञ, डॉक्टर, वैज्ञानिक, विषाणूशास्त्रज्ञ, एपिडेमिओलॉजिस्ट आणि प्राध्यापकांचा समावेश करण्यात आला होता. जास्तीत जास्त लोकांना लसीकरणात सहभागी करून करोनाच्या लाटेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते , असे  मतही या तज्ज्ञांनी व्यक्त केली असून  दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत संक्रमणाची संख्या कमी असू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!