Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कुंभमेळ्यात कोरोना चाचणी महा घोटाळा , कागदोपत्री कंपनीला दिले कंत्राट !!

Spread the love

हरिद्वार : संधी साधू लोक कधी कुठे घोटाळा करतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. त्यात कोरोनासारख्या साथीच्या रोगात गल्ली ते दिल्लीपर्यंत कोण कसा घोटाळा करीत आहे हे जनतेला दिसत नाही असे नाही पण या भ्रष्टाचाराला करणार काय असा  निरुत्तरित प्रश्नच फक्त उपस्थित होतो त्यातून सध्या काहीच होत नाही हेच खरे. मास्क खरेदीपासून ते कोरोनासाठी लागणाऱ्या सर्व सेवा , सुविधा , साहित्य याच्या खरेदीत आणि कंत्राटात सर्वत्र घोटाळे झाले आहेत.  उत्तरखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये कोरोना चाचण्यांसंदर्भात झालेला असाच एक जगजाहीर झाला असून त्याची चौकशी चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घोटाळ्यातील नवीन नवीन माहिती रोज समोर येत आहे. कुंभमेळ्यासंदर्भात आरोग्य विभागाने ज्या मॅक्स कॉर्परेट नावाच्या कंपनीला एक लाख करोना चाचण्यांचे  कंत्राट दिले  होते  ती कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान न्यूज १८ ने केलेल्या पडताळणीमध्ये  कोरोनाच्या एक लाख चाचण्यांचे  कंत्राट देण्यात आलेली मॅक्स कार्पोरेट  कंपनी केवळ कागदावर म्हणजेच ऑन पेपर असल्याचा खुलासा झाला आहे. अशा या एका बनावट कंपनीला कुंभमेळ्यामधील करोना चाचण्या करण्याचे  कंत्राट देण्यात आल्याचे  उघड झाल्याने कुंभमेळा आयोजनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

१० दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश

उपलब्ध माहितीनुसार सदर  कंपनीची नोंदणी ज्या पत्त्यावर झालीय त्या ठिकाणी कोणताही कंपनी आढळून आली नाही. या प्रकरणामध्ये प्रशासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तपास समितीची स्थापना केली आहे. तर दुसरीकडे कुंभमेळ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या अधिकाऱ्यांनीही आपल्या बाजूने एका समितीची स्थापना करुन तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे चौकशी करणारे हि तीच यंत्रणा आहे ज्यांना कंत्राटे देण्याचा अधिकार आहे.

या प्रकरणात  कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉ. अर्जुन सिंह सेंगर यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोग्य विभागाने सर्व खासगी प्रयोगशाळांसोबत करार केला होता. मात्र दिल्लीमधील लाल चंदानी लॅब आणि हिस्सारमधील नालवा प्रयोगशाळेसोबत थर्ड पार्टी करारानुसार कंत्राट देण्यात आले  होते. हरिद्वारचे जिल्हाधिकारी सी. रविशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार तपासादरम्यान खासगी प्रयोगशाळांच्या काराभारामध्ये अनेक ठिकाणी नियोजनामधील गोंधळ दिसून आला. यामध्ये दुसऱ्या शहरांमधील नावांचा वापर करणे, एका ओळखपत्रावर अनेकदा चाचण्या झाल्याचे  दाखवणे  आणि एकाच प्रयोगशाळेत मोठ्या संख्येने चाचण्या करण्यात येणे  यासारख्या प्रकरणाचा समावेश आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून १० दिवसांमध्ये अहवाल सादर केला जाणार आहे. गोंधळ असल्याचे  सिद्ध झाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे  प्रशासनाने स्पष्ट केले  आहे.

काय आहे प्रकरण ?

उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एप्रिल महिन्यात पार पडलेल्या कुंभमेळ्यात  मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. मुळात या  कुंभमेळ्याच्या आयोजनाला परवानगी दिल्याने आधीच वाद झालेला असतानाच आता या कुंभमेळ्यामधील कोरोना चाचणी घोटाळ्याची  माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे उच्च न्यायालयापासून अनेक सरकारी संस्थांनी या कुंभमेळ्याच्या आयोजनासंदर्भातील अनेक सूचना केल्या होत्या .

पंजाबमधील फरीदकोट येथे राहणाऱ्या एका एलआयसी एजंटमुळे हा घोटाळा उघड झाला आहे.  विपन मित्तल असे  या एलआयसी एजंटचे  नाव आहे. मित्तल यांना २२ एप्रिल रोजी त्यांच्या करोना चाचणीचा निकाल निगेटीव्ह असल्याचे  त्यांना कळवण्यात आले . मात्र मित्तल त्यांनी  करोना चाचणी केलेली नसतानाही त्यांना हा मेसेज आल्याने ते गोंधळले. आपली खासगी माहिती चोरीला जात असल्याची शंका आल्याने त्यांनी यासंदर्भातील चौकशी केली. त्यांनी याबद्दल संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. ही तक्रार जिल्हा स्तरावरुन टप्प्याटप्प्यात थेट माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज करण्यापर्यंत पोहचली. या आरटीआय अर्जाला आलेल्या उत्तरामधून हा करोना चाचणी घोटाळा समोर आला.

अधिकाऱ्यांकडून उडवा -उडवीची उत्तरे

दरम्यान मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार करोना चाचणीसंदर्भातील मेसेजमुळे त्यांना शंका आली. “माझ्या करोना चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याचा मेसेज मला आला. मात्र मी करोना चाचणी केलीच नव्हती. मी यासंदर्भात जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना भेटलो. मात्र सगळीकडून त्यांना उडवा -उडवीची उत्तरे मिळाली.  विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यात रस दाखवला नाही. अखेर मी शेवटचा उपाय म्हणून इंडियान काउंसिल ऑफ मेडिकल रिचर्सला ई-मेल करुन तक्रार दाखल केली,” असे  मित्तल यांनी सांगितले.

आयसीएमआरने या प्रकऱणामध्ये तपास करु असे  उत्तर मित्तल यांना दिले . मात्र त्यानंतर मित्तल यांनी करोना चाचणीचा मेसेज आलेल्या प्रयोगशाळेसंदर्भातील माहिती मिळवण्याच्या उद्देशाने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत अर्ज केला. आयसीएमआरने या अर्जाच्या आधारे चौकशी केली असता, मित्तल यांच्या कोरोना चाचणीसाठी सॅम्पल हरिद्वारमध्ये घेण्यात आला आणि तपासण्यात आल्याचे  दिसून आले . त्यानंतर मित्तल यांची तक्रार उत्तराखंड आरोग्य विभागाकडे पाठवण्यात आली. एका मोठ्या चौकशीनंतर अशी माहिती समोर आली की मित्तल यांच्या नावाचा त्या एक लाख लोकांच्या यादीमध्ये समावेश आहे ज्यांच्या करोना चाचण्यांचे खोटे अहवाल हरयाणामधील एका एजन्सीने तयार केले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!